नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंग आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. सॅमसंगचा स्मार्टफोनला ७ जानेवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. या फोनला दुपारी १ वाजता लाँच करण्यात येणार आहे. हँडसेटला अॅमेझॉन इंडिया आणि सॅमसंग इंडिया स्टोरवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. वाचाः सॅमसंग कंपनीच्या म्हणण्यानुसार, गॅलेक्सी एम०२ प्रसिद्ध गॅलेक्सी एम सीरीजचा ऑल राउंडर हँडसेट आहे. सॅमसंगच्या या फोनची किंमत स्वस्त असणार आहे. तसेच यात मॅक्स डिस्प्ले आणि मॅक्स परफॉर्मन्स मिळणार आहे. Samsung Galaxy M02s सोबत कंपनी १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक फीचर्स घेवून येत आहे. सॅमसंगच्या Samsung Galaxy M02s या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले असणार आहे. जो जबरदस्त एक्सपीरियंस ऑफर करणार आहे. वाचाः Samsung Galaxy M02s मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम दिला जाणार आहे. सॅमसंग १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा ४ जीबी रॅम फोन पहिल्यांदा घेवून येत आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. फोनमध्ये मीडिया स्ट्रिमिंग, गेमिंग, फोटोग्राफी आणि जबरदस्त एक्सपीरियन्स ऑफर करणार आहे. वाचाः सॅमसंगच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाणार आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाणार आहे. हँडसेटला १५ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 5000mAh बॅटरी दिली जाणार आहे अशी माहिती आधीच लीक झाली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3s1dnCq