Full Width(True/False)

आंबेडकरी जनतेने याचा विरोध करावा; रिचा चढ्ढासाठी स्वरा भास्कर मैदानात

मुंबई: आपल्या दमदार आणि वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांमुळे ओळखली जाणाऱ्या अभिनेत्री रिचा चड्ढानं जाहीरपणे सर्वांची माफी मागितली आहे. लवकरच तिचा ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरुन सध्या वाद सुरु आहे. ‘मॅडम चीफ मिनिस्टर’च्या पोस्टरमध्ये रिचाच्या हातात झाडू दाखवण्यात आला होता. तर त्या फोटोवर ‘अनटचेबल, अनस्टॉपेबल’ असं लिहिण्यात आलं होतं. हा मजकूर वाचल्यानंतर सोशल मीडियावर रिचा, चित्रपटाचं पोस्टर आणि निर्मात्यांवर अनेकांनी टीका केली. इतकंच नाही तर रिचाला जिवे मारण्याची धमकी देखील देण्याली आली आहे.तसंच रिचाची जीभ कापणाऱ्यास एकानं बक्षिसही जाहीर केलं आहे. हे सर्व होत असतानाच अभिनेत्री हिनं या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. स्वरानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एका ट्विटला रिट्विट केलं आहे. ज्या ट्विटमध्ये रिचासंबंधीत काही कात्रणं पाहायला मिळत आहे. 'हे सर्व लज्जास्पद आहे. हा प्रकार निंदनीय आहे. चित्रपटाविषयी असूच शकतात. पण एखाद्याला हिंसेसाठी प्रवृत्त करणं हा गुन्हाच आहे. आणि या प्रकाराचा निषेध करायला हवा. आंबेडकरवादी, दलित, स्त्रीवादीलोकांनी याविरोधात उभं राहावं', असं स्वरानं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. रिचाने मागितली माफीटीका झाल्यानंतर आता रिचानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आणि त्यावर टीका झाली. पण काही गोष्टी योग्य असल्यामुळंच ही टीका सहन करावी लागली', असं रिचा म्हणाली. पुढे ती म्हणते, 'आमच्या चुकीची जाणीव झाल्यावर आम्ही दुसऱ्याच दिवशी एक नवीन पोस्टर तयार केलं. कोणीही मुद्दाम किंवा जाणूनबुजून हे करण्याचा प्रयत्न केला नाही. झालेल्या प्रकाराबद्दल सगळ्यांची क्षमा मागते.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sz2PdS