मुंबई- स्टारर हा सिनेमा २०२१ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला सर्वात पहिला सिनेमा आहे. १३ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. बऱ्याच दिवसांपासून विजयचे चाहते या सिनेमाची वाट पाहत होते. जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला चाहत्यांची क्रेझ अक्षरशः शिगेला पोहोचली होती. प्रेक्षकांचं सिनेमा आणि सुपरस्टारसाठीचं वेडेपण सिनेमा व्यवसायासाठी कितीही चांगलं असलं तरी त्याचे दुष्परिणामही तेवढेच आहेत. चाहत्यांच्या वेडेपणाने कोविड- १९ संदर्भात लावण्यात आलेले नियम धाब्यावर बसवण्यात आले. प्रेक्षकांनी आणि चित्रपटगृहाच्या मालकांनी सर्व नियम तोडल्यामुळे पोलिसांनी चेन्नईतील चित्रपटगृहावर दंड आकारला. पहाटे ४ वाजल्यापासूनच सुपरस्टार विजयचे चाहते चैन्नईतील वेगवेगळ्या चित्रपटगृहाच्या परिसरात गोळा होताना दिसले. लोकांनी विजयच्या कटआउटवर दूधाचा अभिषेक केला. चित्रपटगृहांच्या बाहेर, ढोल- ताशा वाजवण्यात आले. एवढंच नाही तर सोशल डिस्टन्टिंगचे तर तीन तेरा वाजले होते. अनेकांनी तोंडाला मास्कही लावले नव्हते. हे तर चित्रपटगृहा बाहेरचं चित्र होतं. पण चित्रपटगृहाच्या आतही फारशी वेगळी परिस्थिती नव्हती. एएनआयच्या वृत्तानुसार, काशी थिएटरमध्ये नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल स्थानिक पोलिसांनी ६ हजार रुपयांचा दंड आकारला. या चित्रपटगृहात ५० टक्के क्षमतेपर्यंतच प्रेक्षकांना परवानगी देण्याचा नियम असूनही त्याहून जास्त लोकांना प्रवेश देण्यात आला होता.दरम्यान, तामिळनाडू सरकारने यापूर्वी १०० टक्के क्षमतेने थिएटर सुरू करण्याचे आदेश दिले होते. पण केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर ते कमी करून ५० टक्के करण्यात आलं. मास्टर सिनेमासाठीचा लोकांचा उत्साह लक्षात घेता, सिनेमा विक्रमी सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मास्टर सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात परत येत आहेत ही एक चांगली गोष्ट असल्याचं सिनेव्यापार विश्लेषकांचं म्हणणं आहे. यामुळे या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांसाठी ही एक चांगली गोष्ट आहे. मास्टर सिनेमाचे दिग्दर्शक लोकेश कानगराज, अभिनेत्री मालविका मोहनन आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर यांनी चेन्नईतील रोहिणी चित्रपटगृहात हा सिनेमा पाहिला. मास्टर सिनेमा गुरुवारी मकर संक्रांतीच्या दिवशी विजय द मास्टर म्हणून हिंदीमध्ये प्रदर्शित होत आहे. व्यापार अहवालानुसार, मास्टर देशभरात ३ हजार ८०० स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. त्यापैकी १५०० स्क्रीन या हिंदीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3snGqQH