Full Width(True/False)

Indian Idol च्या स्पर्धकाला बप्पी लहिरींनी दिली सोन्याची चेन

मुंबई- या विकेण्डला '' मध्ये प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार दिसणार आहेत. नुकताच वाहिनीने आगामी भागाचा एक प्रोमो प्रसिद्ध केला आहे. यात बप्पी दा स्पर्धकांना एक विशेष अट घालताना दिसत आहेत. जो स्पर्धक सर्वोत्कृष्ट गाणं गाईल त्याला ते एक सोनसाखळी भेट म्हणून देणार आहेत. विशेष म्हणजे स्पर्धक याने यात बाजी मारली. एका वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, उत्तराखंडमधील चंपावत येथे राहणाऱ्या पवनदीपने 'किसी नजर को तेरा इंतजार आज भी है' या गाण्यावर परफॉर्म केलं. यावेळी त्याने पियानोही वाजवला. पवनदीपची ही प्रतिभा पाहून बप्पी दा त्याचे चाहते झाले. त्ययांनी पवनदीपला फक्त सोनसाखळीच भेट म्हणून दिली नाही तर त्यांच्यासोबत काम करण्याची ऑफरही दिली. मीडिया रिपोर्टनुसार, बप्पी लाहिरी म्हणाले की, 'इतक्या लहान वयात पवनदीपची कामगिरी पाहून मला खूप आनंद झाला. कोणत्याही गायकाला एखादं तरी वाद्य वाजवता येणं आवश्यक असतं. स्वतः मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तबला वादन सुरू केलं होतं.' हिमेश रेशमियाने दिली १० गाण्यांची ऑफर बप्पी लाहिरी व्यतिरिक्त ' १२' चा परीक्षक आणि संगीतकार-गायक हिमेश रेशमिया यानेही पवनदीपचं भरभरून कौतुक केलं. यासोबतच त्याला १० गाणी गाण्याची ऑफरही दिली. पवनदीपला त्याच्या सुरेख आवाजामुळे आणि कित्येक वाद्य वाजवता येत असल्यामुळे परीक्षकांकडून वारंवार कौतुक केलं जातं. त्याला अनेकदा स्टॅडिंग ओवेशनही मिळालं आहे. पवनदीप गिटार, पियानो, ढोलक, तबला आणि ड्रम यांसारखे वाद्य वाजवू शकतो. कोण आहे पवनदीप राजन मिळालेल्या माहितीनुसार, पवनदीप उत्तराखंडचा असून २०१५ मध्ये 'व्हॉईस इंडिया सीझन १' चा तो विजेता होता. संगीत दिग्दर्शक म्हणून त्याने अनेक पहाडी आणि मराठी सिनेमांना संगीत दिलं आहे. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, पवनदीपने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक संगीत मैफिली सादर केल्या आहेत. लहान वयात केलेल्या एवढ्या मोठ्या कामगिरीमुळे उत्तराखंड सरकारने पवनदीप राजन याला 'उत्तराखंडचा युवा राजदूत' ही पदवी दिली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3snvbHW