Full Width(True/False)

Watch- दीपिका पादुकोणने एका क्लिपमध्ये दाखवलं संपूर्ण आयुष्य

मुंबई- मंगळवारी (५ जानेवारी) दीपिका पादुकोणने आपला वाढदिवस थाटामाटात साजरा केला. या निमित्ताने तिने एक शानदार पार्टी दिली होती. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी तिच्या या पार्टीत सहभाग घेतला होता. फक्त मित्र- मैत्रिणीच नाही तर तिच्चा जगभरातल्या चाहत्यांनी दीपिकाला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आता दीपिकाने सर्वांसाठी सोशल मीडियावर एक मोन्टाज देखील शेअर केलं आहे. यात तिच्या बालपणापासूनचे ते आतापर्यंतचे अनेक सुंदर क्षण दाखवण्यात आले आहेत. दीपिकाने दाखवलं आपलं संपूर्ण आयुष्य ३५ वर्षांची आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये तिने अनेक फोटोंमधून आपला जीवन प्रवास दाखवला आहे. मॉडेलिंगच्या असाइनमेन्टपासून ते लग्नापर्यंत आणि बालपणीपासून ते आतापर्यंत अनेक गोष्टींची झलक या व्हिडिओमध्ये दिसते. यासोबतच दीपिकाने तिच्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत. व्हिडिओच्या शेवटी तिच्या लहानपणीचा एक फोटो आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, आपले ध्येय (केक) कधीही चुकवू नका. रणवीरनेही व्यक्त केलं सोशल मीडियावर प्रेम दरम्यान, याने दीपिकाचा लहानपणीचा फोटो शेअर करत एक गोड मेसेजही लिहिला. माझा प्राण, माझं आयुष्य, माझी बाहुली वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यासोबतच त्याने दीपिकाला मिठी मारलेला फोटोही शेअर करत बीवी नंबर १ अशी उपमा तिला दिली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XcVguP