Full Width(True/False)

ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा Vivo Y20A ची भारतात विक्री सुरू, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः ला देशात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. विवोच्या या फोनला याच आठवड्यात देशात लाँच करण्यात आले होते. हा स्मार्टफोन विवो Vivo Y20 चा स्वस्त व्हेरियंट आहे. या फोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासोबत 5000mAh बॅटरी यासारखे फीचर्स दिले आहेत. तसेच या फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः Vivo Y20A ची भारतात किंमत-उपलब्धता विवो कंपनीचा Vivo Y20A स्मार्टफोनची भारतात ११ हजार ४९० रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. या फोनला डॉन व्हाइट आणि नेबुला ब्लू कलर मध्ये लाँच केले आहे. विवो इंडिया ऑनलाइन स्टोर वर खरेदी करता येवू शकते. फोनला लवकरच ई-कॉमर्स साइट्स आणि ऑफलाइन रिटेलर्स कडे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. विवो इंडिया स्टोरवर हँडसेटला एक्सचेंज डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय ऑप्शनवर खरेदी करता येवू शकते. वाचाः Vivo Y20A चे फीचर्स ड्यूल सिम असलेला हा Vivo Y20A स्मार्टफोन अँड्रॉयड ११ बेस्ड फन टच ओएस ११ वर काम करतो. फोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर आणि ३ जीबी रॅम दिला आहे. ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येवू शकते. स्मार्टफोनमध्ये रियरवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G LTE, वाय फाय, एफएम रेडियो, मायको यूएसबी आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक यासारखे फीचर्स दिले आहेत. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. १० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/386yTxG