नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर सध्या मोबाइल बोनांजा सेल सुरू आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करता येऊ शकते. हा सेल २८ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये पोको सी ३ स्मार्टफोनला खूपच स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः फ्लिपकार्ट सेल दरम्यान आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड्स किंवा ईएमआय ट्रान्झक्सनवर १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. सोबत नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन आणि एक्सचेंज ऑफर्स सुद्धा दिले जात आहे. सोबत काही बँक ऑफर्स सुद्धा या ठिकाणी दिले जात आहेत. पोकोच्या या फोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. या फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लिस्टेड आहे. सेल सोबत याला ६ हजार २९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या व्हेरियंटला भारतात ७ हजार ४९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले होते. वाचाः पोको सी ३ चा आणखी एक ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी व्हेरियंट येतो. फ्लिपकार्टवर या फोनची किंमत सध्या ७ हजार ९९९ रुपये आहे. आयसीआयसीआय बँक ऑफरचा फायदा घेता येऊ शकतो. या व्हेरियंटला भारतात ८ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले होते. याची किंमत कमी करून नंतर ८ हजार ४९९ रुपये केली होती. पोकोचा हा बजेट फोन आर्कटिक ब्लू, लाइम ग्रीन आणि मॅट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2O1nUOm