मुंबई- छोट्या पडद्यावरील '' ही मालिका टीव्हीविश्वातील सर्वात जास्त वर्ष चालणारी मालिका झाली आहे. त्यातील अतरंगी कलाकारांमुळे या मालिकेची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. प्रत्येक कलाकार उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचा आणि खळखळून हसवण्याचा प्रयत्न करत आहे. याचमुळे मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. त्यातही नेहमी आनंदी असणारी आणि संपूर्ण गोकुळधाम सोसायटीला तिचं घर समजणारी दयाबेन प्रेक्षकांच्या जास्त आवडीची होती. तिच्या गरबा खेळण्याच्या हटके स्टाइलमुळे ती गृहिणींची तर अत्यंत लाडकी आहे. परंतु, गेली अनेक वर्ष दयाबेन मालिकेतून गायब आहे. मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री २०१७ पासून मालिकेपासून दूर आहे. प्रेग्नन्सीचं कारण देऊन दिशाने मालिका सोडली होती. परंतु, तीन वर्ष उलटूनही ती कार्यक्रमात परत आली नाही. मालिकेतील एका भागात ती दिसली होती तेव्हा दिशाच्या मालिकेत पुन्हा येण्याबद्दल बोललं जात होतं. तिच्या मालिकेत येण्याचे अनेक कयास लावले जात होते. परंतु दिशा मालिकेत पुन्हा दिसली नाही. मालिकेच्या निर्मात्यांनी दिशाला मालिकेत पुन्हा आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांचे प्रयत्न व्यर्थच गेले असं म्हटलं तर चुकीचंं ठरणार नाही. यादरम्यान, दिशाची भूमिका दुसऱ्या अभिनेत्रीला देण्याबद्दलही बोललं गेलं होतं. परंतु, त्या सगळ्या अफवा असल्याचं समोर आलं. दरम्यान आता अभिनेत्री राखी विजान हिने दयाबेनची भूमिका करण्याची इच्छा दर्शवली आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटलं, 'कोणीही दयाबेन बनू शकत नाही. कारण ते एक वेगळंच पात्र आहे. मला ती भूमिका साकारायला आवडेल. मी प्रेक्षकांना पुन्हा हसवण्यासाठी तयार आहे.' यावर निर्मात्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी अंजली भाभीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नेहा मेहतानेही काही महिन्यांपूर्वी मालिका सोडली. तिच्या जागी सुनैना फौजदार आता ही भूमिका साकारत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dQ0pmj