Full Width(True/False)

6000mAh बॅटरीच्या Poco M3 चा आज सेल, कॅशबॅक आणि डिस्काउंट मिळणार

नवी दिल्लीः पोकोचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन चा आज सेल आहे. १० हजार ९९९ रुपये किंमत असलेल्या या फोनचा आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर सेल सुरू होणार आहे. फोनला फ्लिपकार्ट अॅक्सेस बँक क्रेडिट कार्ड वरून खरेदी केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅकचा फायदा मिळणार आहे. तसेच पोकोच्या या फोनला १८३४ रुपयांच्या प्रति महिना नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येऊ शकते. फोनला एक्सचेंज ऑफरमध्ये १० हजार ३५० रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकतो. वाचाः Poco M3 चे फीचर फोनमध्ये 1080x2340 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.३३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ६६२ एसओसी चिपसेट दिला आहे. ड्यूअल नॅनो सिम सपोर्ट करणारा हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड MIUI 12 वर काम करतो. फोटोग्राफीसाठी पोकोच्या या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः पोकोच्या या फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh ची बॅटरी दिली आहे. जी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. ५१२ जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट दिला आहे. या डिव्हाइसला कनेक्टिविटीसाठी इन्फ्रारेड ब्लास्टर, 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी टाइप-C आणि 3.5mm हेडफोन जॅक यासारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZiNZuu