मुंबई: बिग बॉसचा १४ वा सीझन घरातील भांडणं आणि स्पर्धकांच्या आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. येत्या २१ फेब्रुवारीला या सीझनचा फिनाले एपिसोड प्रसारित होणार आहे. फिनाले वीकसाठीच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये , अली गोनी, आणि निक्की तांबोळी यांचा समावेश आहे. या पाच जणांपैकी एकाची निवड या सीझनचा विजेता म्हणून होणार आहे. या विनरला कॅश प्राइज आणि बिग बॉसची ट्रॉफी मिळते हे तर सर्वांनाच माहित आहे. पण यंदाच्या विजेत्याला ट्रॉफी व्यतिरिक्त आणखी काय मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. बिग बॉसच्या विजेत्यासाठी यंदा ५० लाख रुपये प्राइज मनी ठेवण्यात आले आहेत. पण विजेत्याला फक्त ३६ लाख रुपयेच मिळणार आहेत. कारण राखी सावंतनं फिनाले विकमध्ये जाण्यासाठी या रकमेतील १४ लाख रुपये डिपॉझिट केले आहेत. सामान्यपणे फिनालेच्या टॉप ३ स्पर्धकांची घोषणा करण्याआधी एका स्पर्धकाला १० लाख घेऊन फिनालेच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा पर्याय दिला जातो. या सीझनमध्ये असं झाल्यास तर ३६ लाखातून १० लाख वजा करून २६ लाख एवढीच रक्कम विजेत्याला मिळणार आहे. अर्थात हा फक्त अंदाज आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. विनिंग अमाउंट व्यतिरिक्त बिग बॉस १४ च्या विनरला क्रिस्टल ट्रॉफी मिळणार आहे. ज्याची झलक नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सलमान खाननं दाखवली होती. याशिवाय विजेत्या स्पर्धकाला प्रत्येक आठवड्याची फी मिळणार आहे. जी त्यांनी शोमध्ये येण्याआधी साइन केली होती. तर रनरअप प्राइज मनी मिळत नाहीत. त्यांना केवळ त्यांनी साइन केलेली फीची रक्कम मिळते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dhc3GD