Full Width(True/False)

Barcode Scanner अॅपमध्ये आले व्हायरस, फोनमधून तात्काळ डिलीट करा

नवी दिल्लीः अॅप व्हायरसच्या कचाट्यात सापडला आहे. Malwarebytes ने ही माहिती दिली आहे. व्हायरसने युजर्संना इन्फेक्ट केल्यानंतर बारकोड स्कॅनरला गुगल प्ले स्टोरवरून हटवले आहे. रिपोर्टमध्ये हेही सांगितले की, युजर्संना खूप साऱ्या जाहिराती पाहायला मिळत होत्या. तसेच त्यांच्या डिफॉल्ट ब्राउजर द्वारे ओपन होत होत्या. अॅपमध्ये व्हायरसची तक्रार करण्यात आल्यानंतर गुगलने तात्काळ या अॅपला प्ले स्टोरवरून हटवले आहे. अॅपला प्ले स्टोरवरून १ कोटींहून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आलेले आहे. वाचाः Malewarebytes च्या रिपोर्ट नुसार, डिसेंबरच्या अखेर पर्यंत आमच्या फोरम युजर्सपैकी एक डिस्ट्रेस कॉल मिळणे सुरू झाले होते. या युजर्संना जाहीराती दिसत होत्या. त्यांच्या डिफॉल्ट ब्राउजर द्वारे ओपन होत होत्या. यात विशेष म्हणजे कोणतेही अॅप इन्स्टॉल करण्यात आलेले नव्हते. जे इन्स्टॉर होते त्यांना गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करण्यात आले होते. यानंतर एका Anon00 यूजरनेम च्या युजरने पाहिले की, जाहिराती बऱ्याच वेळापासून इंस्टॉल अॅपवरून येत आहेत. या अॅपला गुगल प्ले स्टोरवर १ कोटीहून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. आम्ही लवकरच या व्हायरसला डिटेक्ट केले असून गुगलनेी याला प्ले स्टोरवरून हटवले आहे. वाचाः रिपोर्टमध्ये सांगितले की, युजर्संच्या मोबाइल मध्ये हे अॅप खूप आधीपासून इंस्टॉल होते. डिसेंबर मध्ये एक अपडेट आल्यानंतर बारकोड स्कॅनर एक मॅलिशस अॅप मध्ये बदलले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, हे अपडेट ४ डिसेंबर २०२० रोजी रोलआउट करण्यात आले होते. या अॅप अपडेटमध्ये एक Android/Trojan.HiddenAds.AdQR कोड होते. ज्याने युजर्सचा आपला स्मार्टफोनचा डिफॉल्ट ब्राउजर वर थर्ड पार्टी अॅड साइटवर रिडायरेक्ट होत होते. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप असेल तर तात्काळ याला डिलीट करा. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aKyBg1