Full Width(True/False)

राजीव कपूर यांच्या आयुष्याशी निगडीत या १० गोष्टी माहीत आहेत का?

मुंबई- ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव यांच्या आयुष्यातील फारशा माहीत नसलेल्या गोष्टी आज जाणून घेऊ.. १. राज कपूर यांचा सर्वात लहान मुलगा राजीव कपूर यांचा जन्म २५ ऑगस्ट १९६२ मध्ये मुंबईत झाला. त्यांना चिंपू नावाने घरात हाक मारायचे. २. १९८३ मध्ये 'एक जान हैं हम' या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ३. १९८५ मधील 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमाने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. ४. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन आणि निर्माते म्हणूनही काम पाहिलं. ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'प्रेमग्रंथ' सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं. 'आ अब लौट चले' सिनेमाची निर्मिती त्यांनी केली. ५. सिनेकरिअर फारसं न चालल्यानंतर २००१ मध्ये त्यांनी आर्किटेक्ट आरती सब्बरवाल यांच्याशी लग्न केलं. ६. हे लग्न फारसं चाललं नाही. लग्नाच्या दोन वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. ७. यानंतर राजीव यांनी दुसरं लग्न केलं नाही. ते मोठे भाऊ रणधीर कपूर यांच्यासोबतच राहू लागले. राजीव यांना मुलं नाहीत. ८. राजीव यांच्या पश्चात त्यांचा मोठा भाऊ रणधीर कपूर आणि त्यांचं कुटुंबिय तसेच बहीण रिमा जैन आणि त्यांचं कुटुंब आहे. राजीव यांना कुटुंबासोबत जेवायला प्रचंड आवडायचं. ९. एक अभिनेता म्हणून १९९० मध्ये त्यांनी 'झिम्मेदार' या सिनेमात अखेरचं काम केलं. १०. राजीव कपूर यांना मेरा नाम जोकर हा सिनेमा इतका आवडायचा की, त्यांनी हा सिनेमा १५० हून जास्त वेळा पाहिला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jz77xC