मुंबई: बिग बॉस १४ च्या फिनालेसाठी आता काही तासांचा अवधी उरला आहे. फिनालेसाठी रुबीना दिलैक, निक्की तंबोळी, अली गोनी, , या पाच स्पर्धकांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्पर्धक एकमेकांवर वरचढ ठरल्यानं विजेता कोण होणार हे सांगणं किंवा त्याचा अंदाज लावणं सुद्धा कठीण आहे. अशात 'द खबरी'चं एक ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात वोटिंगमध्ये सर्वात पुढे असल्याचं म्हटलं आहे. बिग बॉस आणि टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित अपडेट देणाऱ्या 'द खबरी'च्या ट्विटर हॅण्डलवरून एक ट्वीट करण्यात आलं आहे. ज्यात फिनाले विकच्या पाचव्या दिवसापर्यंतचं वोटिंग देण्यात आलं आहे. जे पाहिल्यावर सर्वच हैराण आहेत कारण पहिल्या तीन स्पर्धकांना मिळालेल्या मतांमध्ये खूपच कमी फरक असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरून या सीझनच्या विजेतेपदासाठी स्पर्धकांमध्ये जोरदार टक्कर होणार हे निश्चित आहे. 'द खबरी'च्या ट्वीटनुसार वोटिंगमध्ये रुबीना दिलैक पहिल्या क्रमांकावर आहे. तिला ३४ टक्के मतं मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राहुल वैद्यला ३० टक्के मतं मिळाली आहेत. दोघांच्याही टक्केवारीत फारसा फरक नसल्यानं या दोघांमध्ये सध्या जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. वोटिंगच्या या शर्यतीत तिसऱ्या नंबरवर अली गोनी आहे. अलीला २३ टक्के मतं मिळाली आहेत. याशिवाय चौथ्या क्रमाकांवर निक्की तंबोळी आहे. निक्कीला सात टक्के मतं मिळाली आहेत. तर राखी सावंतला सहा टक्के मतं मिळाली आहेत. राखी पाचव्या क्रमांकावर असून निक्की आणि राखीमध्ये वोटिंगच्या टक्केवारीत जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dwQvWv