मुंबई: भारतीय क्रिकेट टीमचा माजा क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनची आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सच्या संघात निवड झाली आहे. पण यावरून पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला आहे. अर्जुन हा मुलगा असल्यानं त्याला मुंबई इंडियन्सच्या संघात सहज जागा मिळाली असं म्हणत अनेकांनी अर्जुनवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. पण आता यावर अभिनेता फरहान अख्तरनं प्रतिक्रिया देत अर्जुनला पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर सध्या खूप ट्रोल होत आहे. अशात आता अर्जुनला पाठिंबा देत अभिनेता फरहान अख्तरनं ट्वीट केलं आहे. त्यानं लिहिलं, 'मी आता अर्जुन तेंडुलकर बद्दल बोलायला हवं असं मला वाटतं. आम्ही दोघं नेहमी एकाच जिममध्ये वर्कआउट करतो. तो त्याच्या फिटनेससाठी किती मेहनत करतो हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. चांगला किक्रेटर होणं हे त्याचं ध्येय आहे. त्यामुळे अर्जुनसाठी घराणेशाही सारखा शब्दप्रयोग करणं चुकीचं आहे. त्यानं सुरुवात करण्याआधीच त्याचा उत्साह कमी करू नका.' याशिवाय अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरनं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर अर्जुनसाठी एक पोस्ट लिहिली होती. तिनं लिहिलं, कोणीच तुझी संधी तुझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही आणि तुझी संधी आहे. मला तुझा अभिमान वाटतो. तर अर्जुनच्या निवडीबाबत बोलताना मुंबई इंडियन्सचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट झहीर खान म्हणाला, 'अर्जुन खूप मेहनती आहे. त्याला बऱ्याच नव्या गोष्टी शिकायच्या आहेत. सचिन तेंडुलकरचा मुलगा म्हणून त्याच्यावर नेहमी प्रेशर राहणार आहे आणि त्याला या प्रेशरसोबत जगावं लागणार आहे.' आयपीएलसाठी गुरुवारी झालेल्या लिलावात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने २० लाखांची बोली लावत आपल्या टीममध्ये सहभागी करुन घेतलं. अर्जुनच्या निवडीनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा घराणेशाहीचा वाद सुरू झाला. तर काही लोकांनी अर्जुनला पाठिंबा दिला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qHA5OL