Full Width(True/False)

स्मार्टफोन कॅमेऱ्यावरून जाणून घ्या हार्ट रेट, गुगलचे खास नवे फीचर

नवी दिल्लीः गुगलने युजर्सचा अनुभव अधिक चांगला बनवण्यासाठी नवीन नवीन फीचर आणले आहेत. या यादीत आता पिक्सल स्मार्टफोनच्या गुगल फीट अॅपमध्ये नवीन हार्ट रेट आणि रेस्पिरेटरी मॉनिटर देणार असल्याची घोषणा केली आहे. हे फीचर या महिन्यात अधिकृतपणे सर्व युजर्संसाठी रोलआउट करण्यात येणार आहे. कंपनीने या फीचरला रोलआउट करण्याची तारीख मात्र सांगितली नाही. वाचाः असे ट्रॅक करेल हार्ट आणि रेस्पिरेटरी रेट गुगल पिक्सल डिव्हाइससाठी येणाऱ्या या दोन्ही फीचर स्मार्टफो कॅमेऱ्याची मदत होणार आहे. युजरच्या हार्ट रेटला मॉनिटर करण्यासाठी फिंगरटिप्स वरून जाणाऱ्या ब्लड कलरमध्ये होणाऱ्या बदलला ट्रॅक करणार आहे. तर दुसरीकडे रेस्पिरेटरी मॉनिटर युजर्सच्या चेस्टचा राइज अँड फॉलला ट्रॅक करणार आहे. वााचाः कंपनीच्या एका हेल्थ प्रोडक्ट मॅनेजरने सांगितले की, डॉक्टर सुद्धा रुग्णांच्या रेस्पिरेटरी रेटला श्वास घेण्यादरम्यान छातीच्या वर गेल्यानंतर तसेच खाली जाताना ट्रॅक करीत असतात. गुगलचे रेस्पिरेटरी मॉनिटर सुद्धा हीच पद्धत वापरत आहे. वाचाः मेडिकल कंडिशन्सचा अंदाज लावू शकत नाही कंपनीने म्हटले की, या फीचरला यामुळे रोलआउट केले जात आहे की, याच्या मदतीने युजर्सला आपल्या ओव्हरऑल हेल्थला ट्रॅक करता येऊ शकेल. तसेच कंपनीने हेही सांगितले की, हे दोन्ही मॉनिटर मेडिकल कंडिशन्सचा अंदाज लावू शकत नाही. वाचाः सॅमसंग डिव्हाइसमध्ये आहे असे फीचर गुगल पिक्सल फोन्ससाठी आलेले हार्ट रेट मॉनिटर बऱ्याच अंशी सॅमसंगच्या गॅलेक्सी एस १० सारखे आहे. याच पद्धतीने काम करणार आहे. सॅमसंगने या फीचरला गॅलेक्सी S10e, Galaxy S20 सीरीज आणि त्यानंतर लाँच झालेल्या स्मार्टफोन्समधून हटवले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36GkFSL