मुंबई- करोनामुळे थांबलेली चित्रपटसृष्टी आता पुन्हा एकदा कामाला लागली आहे. अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी त्यांच्या रखडलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. लॉकडाउनमधील सुरक्षा नियमांचे पालन करत अनेक कलाकारांना पुन्हा चित्रीकरणासाठी बोलावलं जातंय. यात समावेश होतोय तो दिग्दर्शित '' या चित्रपटाचा. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीला मुंबईतील रेड लाईट परिसरात फिरताना आणि तेथील देहविक्री करणाऱ्या महिलांशी गप्पा मारताना पाहिलं गेलं. 'मकडी' चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतेय. त्यासाठी ती 'इंडिया लॉकडाउन' चित्रपटात देहविक्री करणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे. या पात्राचं चित्रपटातील नाव मेहरुन्निसा आहे. आपल्या पात्राला समजून घेण्यासाठी आणि त्याची गंभीरता जाणून घेण्यासाठी श्वेता दिग्दर्शकासोबत मुंबईतील रेड लाईट परिसर कामाठीपुऱ्यात गेली होती. मुख्य म्हणजे तिथे त्यांना खरी मेहरुन्निसादेखील भेटली. तिथे जाण्याच्या आपल्या अनुभवाबद्दल बोलताना श्वेता म्हणाली की, 'मी चित्रपटातील माझ्या पात्राला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. दिग्दर्शकानुसार या पात्राच्या अनुषंगाने माझं बोलणं खूप वेगळं आणि शांत आहे. तिथे फिरण्याचा उद्देश तिथल्या महिलांची बोलण्याची भाषा आणि शैली जाणून घेणे हा होता. मला माझ्या बोलण्यातील लकब बदलण्याची गरज आहे. इथल्या महिलांच्या बारीक हालचालीदेखील माझ्यासाठी महत्वपूर्ण आहेत. त्यांना जवळून जाणून घेण्यासाठी मी इथे आले.' आतापर्यंत अभ्यासाचा भाग म्हणून श्वेताने तब्बूचा 'चांदणी बार', करिना कपूरचा 'चमेली' आणि कोंकणा सेनशर्माचा 'ट्रॅफिक सिग्नल' हे चित्रपट पाहिले आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oTSoyq