मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नेहमाच तिच्या बोल्ड लुक आणि फिटनेस व्हिडीओंमुळे चर्चेत असते. दिशा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. अनेकदा ती जिममधील वर्कआउट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. याशिवाय दिशा तिच्या आणि टायगर श्रॉफच्या नात्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहते. आताही दिशानं असा एक व्हिडीओ शेअर केला आहे जो पाहिल्यावर चाहत्यांना टायगरची आठवण झाली आहे. दिशान तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. दिशानं तिच्या जिम वर्कआउटचा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती वेगवेगळे स्टंट करताना दिसत आहे. दिशाच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यासोबतच बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी सुद्धा कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत. अभिनेता टायगर श्रॉफने सुद्धा दिशाच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. त्यानं लिहिलं, 'व्वा... हे मलाही जमायला हवं' याशिवाय टायगरच्या बहिणीनं सुद्धा दिशाच्या व्हिडीओवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. दिशाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. दिशा नेहमीच फिटनेसच्या बाबतीत जागरुक असलेली दिसते. सोशल मीडियावरही तिचे अनेक फिटनेस व्हिडीओ आहेत. दिशाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच सलमान खानच्या 'राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी तिचा 'मलंग' चित्रपट मागच्या वर्षी रिलीज झाला होता. ज्यात ती आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमू यांच्यासोबत दिसली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2NFZmL1