मुंबई- खानला नुकताच अजून एक मुलगा झाला. ही बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी करिना आणि सैफला शुभेच्छा दिल्या. आता प्रत्येकजण करिना आणि सैफच्या नवजात बाळाचे फोटो पाहण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, काल २३ फेब्रुवारी रोजी करिनाला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला असून ती घरीही परतली. आता तिचे घरी आराम करतानाचे नवीन फोटो समोर येत आहेत. करिना तिच्या घरी बाल्कनीत आराम करताना दिसली. तिने २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता दुसऱ्या मुलाला जन्म दिला. आदल्या दिवशी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास करिनाला मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मुलाच्या जन्मानंतर जवळपास दोन दिवसांनी तिला घरी सोडण्यात आलं. काल मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून काही फोटो समोर आले होते, यात सैफ आणि करिना गाडीत बसून घरी जाताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये तैमूर सैफच्या मांडीवर बसलेला दिसत होता. यापूर्वी कुटुंबातील बरेच सदस्य आणि जवळचे मित्र करिना कपूरला पाहण्यासाठी इस्पितळात गेले होते. लॉकडाउनमध्ये करिनाने ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती. करिना आणि सैफने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, 'आमच्या कुटुंबात नवीन पाहुणा येणार आहे हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. तुमच्या सर्व शुभेच्छा आणि आर्शीवादासाठी खूप आभार.' या प्रोजेक्टमध्ये दिसणार आणि करिना कपूर सैफ अली खानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर तो नुकताच 'तांडव' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. यानंतर तो ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभाससोबत दिसणार आहे. यासोबतच अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिससोबत तो 'भूत पोलिस' मध्येही दिसणार आहे. तर करिना कपूरने आमिर खानसोबतचा आगामी 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. हा सिनेमा यावर्षी प्रदर्शित होईल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2MjJ9dH