मुंबई- बॉलिवूड अभिनेता, निर्माता आणि उद्योजक याचं नाव नेहमीच कोणत्या ना कोणत्या फसवणुकीच्या प्रकरणात समोर आलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता सचिनला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ओमकार रिअल्टर्स प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशीकडून करण्यात आलेल्या १०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी ईडीने सचिनला अटक करण्यापूर्वी त्याची जवळपास १८ तास चौकशी केली होती. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सचिन जोशी हे नावाजलेलं नाव आहे. एवढंच नाही तर त्याने काही हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. तर अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे. सचिनला थोडे थोडके नाही तर चक्क १ हजार कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराबद्दल अटक करण्यात आली आहे. आज सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाईल. यानंतर पुढील कारवाई केली जाईल. ईडीकडून पाठवण्यात आलेल्या समन्सनंतर सचिन ईडीसमोर सादर झाला नव्हता. यानंतर त्यावर कारवाई करत त्याला शनिवारी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं. विशेष म्हणजे सचिन जोशीने २०१७ मध्ये विजय माल्याच्या गोव्यातील 'किंगफिशर' बंगला विकत घेतला होता. हा बंगला विकत घेतल्यामुळे तो बराच चर्चेत आला होता. सचिन JMJ ग्रुपचा प्रमोटर देखील असून तो पान मसाला, परफ्यूम, मद्य व्यवसायाशी जोडला गेला आहे. याशिवाय सचिन प्लेबॉय या रेस्तराँ आणि क्लबच्या चेनचा मालक आहे. सचिन जोशीने मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी शर्मासोबत लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहेत. दरम्यान, टॉप्स ग्रुप प्रकरणात बॉलिवूड अभिनेता राज कपूर यांचा नातू अरमान जैनला देखील ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावला आहे. याअगोदर ईडीने अरमानच्या घरी बुधवारी छापा टाकला होता आणि गुरूवारी त्याला कार्यालयात येण्यास सांगितलं होतं. या प्रकरणात अरमान जैनसोबत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक याचं नावही जोडलं गेलं आहे. या प्रकरणात विहंगचीदेखील चौकशी सुरू आहे. विहंगच्या फोनचा डेटा अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी घेतला होता. यात त्यांना अनेक गोष्टी समोर आल्या. यानंतरच ईडीने या प्रकरणाचा तपास वाढवला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tZDdaL