Full Width(True/False)

लेडी गागाचे कुत्रे झाले चोरी, माहिती देणाऱ्या मिळणार ३.६५ कोटी

मुंबई- प्रसिद्ध पॉप गायिका तिच्या लूक आणि आवाजामुळे नेहमीच चर्चेत असते. कारण जी गोष्ट तिच्या हृदयाच्या सर्वात जवळ होती ती तिच्यापासून दूर करण्यात आली आहे. लेडी गागाचे दोन कुत्र्यांचं अपहरण केलं आहे. लेडी गागाकडे फ्रेन्च बुलडॉग जातीचे तीन कुत्रे आहेत. २०१६ मध्ये तिने हे कुत्रे घेतले होते. बुधवारी रात्री ही घटना घडली. लॉस एन्जेलिसमध्ये तिच्या श्वानांना सांभाळणाऱ्याची रयान फिशर याची गोळी मारून हत्या केली. यानंतर तिचे दोन फ्रेन्च बुलडॉग चोरी करण्यात आले. लॉस एन्जेलिस पोलिसांनी यासंबंधी माहिती देताना म्हटलं की, बंदूकधारी व्यक्ती कुत्र्यांना घेऊन पळाला. या दरम्यान ३० वर्षीय मुलाला त्याने गोळी मारली. सध्या इस्पितळात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री ९.४० च्या सुमारास ही घटना घडली. Variety ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार लेडी गागा हिने कुत्र्यांची माहिती देणाऱ्याला ३.६५ कोटी रुपयांचं बक्षिस देण्याचं जाहीर केलं आहे. काय आहेत त्यांची नावं- लेगी गागाच्या कुत्र्यांची नावं कोजी आणि गुस्ताव आहे. तिचा अजून एक कुत्रा एशिया घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. फ्रेन्च जातीचे बुलडॉग हे सर्वात महागडे आणि प्रतिष्ठित जातीचे कुत्रे म्हणून ओळखले जातात. त्यांची किंमत कोट्यवधींमध्ये असते. या सगळ्यात लेडी गागाच्या कुत्र्यांना का लक्ष्य करण्यात आले यामागचं कारण अजून समजू शकलेलं नाही. लेडी गागाचं तिच्या कुत्र्यांवर प्रचंड प्रेम असून ती त्यांची काळजी घेण्यात कुठलीही कसर कमी पडू देत नाही. त्यांच्या खाण्या-पिण्यापासून प्रत्येक गोष्टीवर तिचं बारीक लक्ष असतं. सद्य परिस्थितीत तिच्याकडे तीन कुत्रे होते. तिने कुत्र्यांच्या देखभालीसाठी खास माणसांचीही नियुक्ती केली आहे. त्यातील एक म्हणजे रयान फिशर आहे. नेहमीप्रमाणे रयान कुत्र्यांना घेऊन बाहेर फिरायला गेला असताना एका अनोळखी व्यक्तीने त्याला गोळी मारली आणि दोन फ्रेन्च बुलडॉग प्रजातीच्या कुत्र्यांना घेऊन पळून गेला. ज्या वेळेस ही घटना घडली, त्यावेळेस लेडी गागा तिच्या आगामी प्रोजेक्टचं चित्रीकरण करत होती. तिने २०१६ साली या तीन कुत्र्यांना दत्तक घेतलं होतं. ती नेहमी त्यांच्यासोबतच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uI8obd