मुंबई: बिग बॉसच्या १४ व्या पर्वाची ट्रॉफी टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकनं जिंकली. रुबीना आणि राहुल वैद्य यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार स्पर्धा झाली. अखेर सलमान खाननं रुबीनाला विजेता घोषित केलं आणि मागच्या ४ महिन्यांपेक्षा अधिक काळ चाललेलं हे पर्व संपलं. पण त्यानंतर सलमाननं लगेचच बिग बॉसच्या १५ व्या पर्वाची घोषणा सुद्धा केली. जे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. यासोबतच सलमाननं आगामी पर्वाबद्दल इतर अनेक खुलासे केले आहेत. बिग बॉसच्या मेकर्सनी १५ व्या पर्वाची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. दरम्यान १५ व्या पर्वाबाबत सलमाननं ग्रँड फिनालेच्या एपिसोडमध्येच काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. सलमाननं सांगितलं की, काही महिनानंतर 'वूट सिलेक्ट'वर बॉस १५ साठी सर्वांना ऑडिशन देता येणार आहे. यासोबतच या प्रक्रियेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना सामान्य जनात वोट पण करू शकते. येत्या काळात यासंबंधीची अधिक माहिती दिली जाणार आहे. सलमाननं ज्याप्रकारे १५ व्या पर्वाची घोषणा केली त्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, या पर्वात पुन्हा एकदा सेलिब्रेटींसोबत कॉमनर्स सुद्धा दिसणार आहेत. २०१६ मध्ये पहिल्यांदा बिग बॉसच्या १० व्या पर्वात हा प्रयोग करण्यात आला होता. या पर्वात सेलिब्रेटींसोबत सामान्य लोकांमधूनही स्पर्धकांची निवड करण्यात आली होती आणि पर्वाचा विजेता ठरलेला मनवीर गुज्जर हा नवा चेहरा होता. याशिवाय ११ व्या पर्वातही मेकर्सनी कॉमनर्स आणि सेलिब्रेटी अशी स्पर्धकांची निवड केली होती. बिग बॉस १४ च्या ग्रँड फिनाले एपिसोडमध्ये सलमाननं सांगितलं की, 'सहा-सात महिन्यांनतर नव्या पर्वात आपण पुन्हा भेटू.' याआधी एका एपिसोडमध्ये सलमाननं सांगितलं होतं की, जर बिग बॉस मेकर्सनी १५ व्या पर्वासाठी त्याच्या मानधनात १५ टक्क्यांनी वाढ केली तरच तो या पर्वाचं होस्टिंग करेल. सूत्राच्या माहितीनुसार एका आठवड्याच्या 'विकेंड का वार' एपिसोडसाठी तब्बल २४ कोटी रुपये मानधन म्हणून घेतो.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2P4d4YB