Full Width(True/False)

मराठी मालिका विश्वात खळबळ; प्रसिद्ध निर्मात्यावर कलाकारांचे पैसे थकवल्याचा आरोप

मुंबई: मालिकेतील कलाकार दिवसातील रोज दहा-बारा तास चित्रीकरण करतात. इतके तास काम करूनही कलाकारांना मानधन मात्र तीन महिन्यांनी मिळतं. अनेकदा तीन महिने उलटूनही पैसे मिळत नाहीत. हाच मुद्दा सध्या मराठी सिनेसष्टीतील कलाकारांनी सोशल मीडियावर मांडला आहे. त्यावर अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा देत त्यांची मतं मांडली आहेत. '' या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील कलाकारांनी मालिकेते निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. , , तसंच यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मंदार देवस्थळी यांच्या कामाचे पैसे दिले नसल्याचं म्हटलं आहे. देवस्थळी सारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकावर हे आरोप करण्यात आल्यानं मराठी सिनेसृष्टीत सध्या खळबळ उडाली आहे. काय म्हटलंय कलाकारांनी त्यांच्या पोस्टमध्ये? नमस्कार ! आम्ही कलाकार नेहमी आपल्याकडुन चांगलं काम व्हावं या हेतूने मेहनत घेत असतो. उत्तम काम आणि ते केल्यावर त्याचा योग्य मोबदला हाच हेतू असतो आणि तो असावा. पण काम करुनही त्याचा पैसा वेळेवरच न मिळणे, योग्य आहे?अनेक वेळा अस होत की आपण खूप प्रामाणि पणे आपले काम( शुटिंग) करतो. आपलं प्रोजेक्ट हे आपल बाळ आहे आणि प्रोडक्शन हाऊस हे आपल घर अस समजून वेळेची, परिस्थितीशी, घरच्यांशी, प्रोडक्शन हाऊस कडून न मिळणाऱ्या गोष्टींशी, हाऊसच्या मीस मॅनेजमेन्टशी अॅडजस्ट करून सर्व तंत्रज्ञ आणि कलाकार अविरत काम करत असतात. चॅनल चा उत्तम सपोर्ट असूनही काही निर्माते कामाचा योग्य तो मोबदला देत नाहीत. अनेक कारणं वारंवार मिळतं असतात. आम्ही मात्र निर्माता जगला तर कलाकार जगला ह्या तत्वांतर्गत काम करत असतो. मग वेळच्या वेळी चॅनलकडून पैसे येऊन पण कलाकारांना आणि तंत्रज्ञानांना पैसे निर्मात्याकडून न मिळण हे योग्य आहे का? निर्मात्याच्या अडिअडचणींच्या वेळेस, एपिसोडची बॅंक नाही म्हणून किंवा कधी कधी निर्मात्यांकडे कॉस्ट्युम्स नाही म्हणून घरून कॉस्ट्युम्स आपले आणून शूटिंगचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मदत करणे आता चुक आहे का? आपल्याच मेहनतीचा हक्काचा मोबदला सतत मागत रहाणे हे योग्य आहे का?


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37BoPfq