मुंबई: बी टाऊनमध्ये काही असे सेलिब्रेटी कपल आहेत ज्यांच्यांतील बॉन्डिंग कमालीच असल्याचं दिसून येत. या सेलिब्रेटी कपलमध्ये हृतिक आणि सुझान यांचाही समावेश होतो. हृतिक आणि सुझान यांचा घटस्फोट झाला असला तरीही त्यांच्यातील मैत्री आणि समजूतदारपणा कायम आहे. या दोघांनीही प्रेमविवाह केला होता. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर हे दोघंही परस्पर संमतीनं घस्फोट घेतला. या दोघांना रेहान आणि रिदान नावाची दोन मुलं सुद्धा आहे. आणि अनेक वर्ष रिलेशनशिपमधअये होते. लग्नानंतर २०१४ मध्ये या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या घटस्फोटानंतर वेगवेगळे अंदाज लावले गेले होते. एकीकडे हृतिकचं नाव कंगना रणौतशी जोडलं गेलं होतं. तर दुसरीकडे सुझानचं नाव अर्जुन रामपालशी जोडलं गेलं होतं. पण या दोघांनी या गोष्टी कधीच मान्य केलं नाही. सुझानला घटस्फोट दिल्यानंतर फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत हृतिक रोशननं तो पुन्हा लग्नाबद्दल विचारही करू शकत नसल्याचं म्हटलं होतं. हृतिक म्हणाला, आज मी आयुष्यात अशा ठिकाणी आहे जिथे मी दुसऱ्या लग्नाचा विचारही करू शकत नाही. मी खूप समाधानी आहे आणि मला खूप शांत सुद्धा वाटत आहे. घटस्फोटानंतर आजही हृतिक रोशन आणि सुझान एकमेकांसोबत आहेत. दोघांमधील मैत्री अद्याप कायम आहे. दोघंही त्यांच्या मुलांसोबत फॅमिली ट्रीपवर जाताना दिसतात. एवढंच नाही तर जेव्हा कंगना रणौतनं जेव्हा हृतिकवर रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करत त्यानं विश्वासघात केल्याचा आरोप केला होता त्यावेळी सुझाननं त्याला पाठिंबा दिला होता. याशिवाय लॉकडाऊनमध्येही सुझान आपल्या मुलांना वेळ देता यावा यासाठी हृतिकच्या घरी शिफ्ट झाली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bNkMxD