मुंबई: प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझाला काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. व्यायाम करत असताना अचानक त्याची तब्येत बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. पण आता तो पूर्णपणे ठिक आहे आणि याची माहिती त्यानं सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली होती. पण आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रेमोनं स्वतःबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या रंगावरून त्याची कशाप्रकारे खिल्ली उडवली जात असे याबद्दल त्यानं या मुलाखतीत सांगितलं. रेमोनं सांगितलं, 'मी लहान असतानाच वर्णभेदाची शिकार झालो होतो. अनेकजण माझ्या रंगावरून लोक माझी खिल्ली उडवत असत. पण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून माझ्या आयुष्यात पुढे निघून गेलो. पण आता मला असं वाटतं की, मी त्यावेळी याच्या विरोधात आवाज उठवायला हवा होता. ' रेमोच्या मते, जेव्हा लोकं तुमच्या बद्दल वाईट बोलत असतात. तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की, तुम्ही काहीतरी चांगलं काम करत आहात. त्यामुळे जेव्हा रंगावरून त्याची खिल्ली उडवली जात होती. त्यावेळी त्यानं या गोष्टीचं कधीच वाईट वाटून घेतलं नाही. त्याकडे दुर्लक्ष करून त्यानं आपलं काम चालू ठेवलं. रेमोबद्दल जेव्हा वाईट बोललं जात असे तेव्हा त्याला अजून चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा मिळत असे. आज मी ज्या ठिकाणी आहे ते केवळ या सर्व गोष्टींमुळेच असल्याचं रेमो सांगतो. रेमो म्हणाला, 'वर्णभेदाची ही समस्या लहान लहान गावांपूरती मर्यादित नाही तर संपूर्ण जगातलं कटू सत्य आहे. जे आपल्याला स्वीकारावं लागतं. बालपणापासूनच मी माझ्या रंगावरून वर्णभेदाला सामोरा गेलो आहे. पण हे इथेच थांबलं नाही. भारतात आणि भारता बाहेरही माझ्या रंगावरून माझी खिल्ली उडवली गेली.' रेमो पुढे सांगतो, 'लहान असताना मी याकडे दुर्लक्ष करत असे पण मी जेव्हा मोठा झालो तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की, याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. आता मी याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सक्षम आहे. पण माझ्या रंगामुळे माझ्यावर लोकांनी ज्या कमेंट केल्या त्यामुळेच मी आज या ठिकाणी आहे. त्यातूनच मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39WFAmQ