Full Width(True/False)

आमिरने पत्नीला लिहिलं होतं रक्ताने पत्र, घटस्फोट देणं पडलं महागात

मुंबई- बॉलिवूडच्या दुनियेतील असा कलाकार आहे, ज्याच्यासोबत काम करण्यासाठी प्रत्येक अभिनेत्री उत्सुक असते. परंतु, खूप कमी लोकांना माहीत आहे की, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीपासूनच आमिर हिच्या प्रेमात होता. रिनासाठी आमिरचं प्रेम इतकं टोकाला गेलं होतं की, आमिरने रिनासाठी एकदा रक्ताने चिठ्ठी लिहिली होती. आमिरच्या या कृत्यानंतर त्याने कधीही असं करू नये अशी ताकीदही रिनाने त्याला दिली होती. रिना आणि आमिरचा धर्म वेगळा असल्याने त्यांच्या लग्नात अनेक अडचणी आल्या होत्या. पण सर्व संकटांचा सामना करत त्यांनी १९८६ साली लग्न केलं. परंतु, त्यांनी लग्नाची बातमी घरातल्यांपासून लपवून ठेवली होती. जेव्हा आमिर आणि रिनाचं लग्न झालं तेव्हा रिना शिकत होती. ती तेव्हा कॉलेजमध्ये होती तर आमिर 'कयामत से कयामत तक' चं चित्रीकरण करत होता. आमिरच्या घरात लग्नाबद्दल कळताचं त्यांनी रिनाचा स्वीकार केला. या पती- पत्नीच्या नात्यात लग्नाच्या काही वर्षांनी कटुता यायला लागली. आमिर 'दिल चाहता है' चे चित्रीकरण करत होता. चित्रीकरणादरम्यान आमिर आणि प्रीती झिंटाच्या प्रेमसंबंधाबाबत चर्चा रंगू लागल्या. तेव्हा रिना आमीरपासून वेगळी राहायला लागली होती. प्रितीने मात्र या गोष्टींबाबत साफ नकार दिला होता. त्यानंतर सगळं काही व्यवस्थित सुरु आहे असं वाटत असतानाचं आमिरच्या आयुष्यात आली. किरण 'लगान' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाचे काम पाहत होती. आमिरला तिच्याबद्दल ओढा वाढू लागला. आधी लग्न झालेलं असतानाही आमिर किरणच्या प्रेमात पडला आणि त्याने रिनापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आमिरच्या या निर्णयाचा रिनाला धक्का बसला होता. परंतु, हा घटस्फोट आमिरसाठी महागडा ठरला. २००२ साली झालेल्या या घटस्फोटात आमिरला रिनाला तब्बल ५० कोटी रुपयांची पोटगी द्यावी लागली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tUt2nU