मुंबई- बॉलिवूडमध्ये अभिनेत्री यांच्या अभिनयाची जेवढी चर्चा होते, तेवढीचं चर्चा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही होते. कधी लग्नाची तर कधी प्रेमाची. ४० वर्षांच्या चित्रपटातील कारकिर्दीत १८० पेक्षा जास्त चित्रपट केलेल्या रेखा यांचं बालपण मात्र अतिशय संकटांनी भरलेलं होतं. दाक्षिणात्य चित्रपटात सुपरस्टार असलेले जेमिनी गणेशन यांनी रेखा यांच्या आई अभिनेत्री पुष्पावल्ली यांना स्वीकारायला नकार दिला होता. पुष्पावल्ली यांना एकूण ६ मुले झाली. त्यातील रेखा आणि राधा या दोघी गणेशन यांच्या मुली होत्या. अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत पुष्पावल्ली यांनी त्यांच्या मुलांचं संगोपन केलं. त्या नेहमी चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणात गुंतलेल्या असतं. जसं वय वाढत गेलं तसं त्यांना काम मिळणं अवघड झालं. इथून संकटांची सुरुवात झाली. त्यांच्यावर असलेलं कर्ज वाढत गेलं. पुष्पावल्ली बराचं काळ आजारी राहू लागल्या. त्यांची मोठी मुलगीही आजरी झाली. मोठा मुलगा बाबूजी कंपोजर बनण्यासाठी प्रयत्न करत होता. बाकी सगळे लहान असल्याने काहीही करू शकत नव्हते. कुटुंब अत्यंत कठीण परिस्थितीत दिवस कंठत होतं. भानुरेखा म्हणजेच रेखा यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मोठ्या कष्टाने डॉक्टरांनी त्यांना वाचवलं. जीव देण्यामागील कारण परीक्षेत नापास होणं होतं. आर्थिक परिस्थितीमुळे रेखा यांना शाळा सोडावी लागली आणि वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. त्या चित्रीकरणासाठी नकार देत तेव्हा त्यांचा भाऊ त्यांना मारत असे व जबरदस्ती चित्रीकरणासाठी पाठवत असे. भानुरेखा जेमिनी यांची मुलगी असल्याने त्यांचा राग ओढवून घेण्याच्या भितीनी कोणीही त्यांना काम देत नसे. आपल्या आईबरोबर झालेल्या अन्यायाची आठवण रेखा यांना कायम राहिली. त्यामुळे त्यांनी गणेशन हे आडनाव लावणं बंद केलं. त्यानंतर रेखा होनून इण्डस्ट्रीवर राज्य करू लागली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Nr8sLf