मुंबई: बॉलिवूडचे महानायक यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवरून याची माहिती दिली. अमिताभ बच्चन यांच्या नव्या पोस्टवरून लक्षात येतं की, त्यांची तब्येत खूपच बिघडली असून येत्या काळात त्यांच्यावर शस्त्रक्रियाही केली जाऊ शकते. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लेटेस्ट ब्लॉग पोस्टमध्ये त्यांची तब्येत बिघडल्याचं आणि त्यांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचं लिहिलं आहे. आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये एका ओळीत अमिताभ यांनी लिहिलं, 'मेडिकल कंडिशन, सर्जरी... यापेक्षा जास्त काही लिहू शकत नाही.' बिग बी यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. मागच्या काही इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्रश्नचिन्हासह एक फोटो पोस्ट केले होते. ज्यातून त्यांनी त्यांच्या आरोग्याच्या अनिश्चिततेकडे इशारा केला होता.याशिवाय त्यांनी २७ फेब्रुवारीला एक ट्वीट केलं आहे ज्यात त्यांनी लिहिलं होतं, 'काहीतरी गरजेपेक्षा जास्त वाढलं आहे... जे कापून टकल्यावर सर्व ठीक होऊ शकतं, उद्याच समजेल कसं होईल हे'. अमिताभ बच्चन यांना 'कुली' चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी एवढी मोठी दुखापत झाली होती की, तो त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न झाला होता. त्यानंतर त्यांच्या आरोग्यात सातत्यानं चढ-उतार होत आहेत. अनेकदा ते रुग्णालयात भरती होतात. याशिवाय मागच्या वर्षी त्यांची करोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2O9nLs4