Full Width(True/False)

जेव्हा शशी कपूर शत्रुघ्न सिन्हा यांना मारण्यासाठी धावले होते

मुंबई- आता मोठ्या पडद्यापासून भलेही दूर असतील, तरीही त्या काळातल्या दिग्गज कलाकारांमध्ये त्यांचं नाव अभिमानाने घेतलं जातं. स्वतःच्या दर्जेदार अभिनयाने त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. तसेच त्यांनी अनेक मल्टीस्टार चित्रपटात काम केले आहे. त्यांचे त्यांच्या सहकलाकारांसोबतचे अनेक मजेदार किस्सेदेखील लोकप्रिय आहेत. सिन्हा यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अशाच एका गमतीदार घटनेबद्दल सांगितले. या प्रसंगात चक्क दिग्गज अभिनेते शशी कपूर त्यांना मारण्यासाठी हातात पट्टा घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेले होते. शत्रुघ्न आणि शशी यांनी अनेक चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केले. एका मुलाखतीदरम्यान सिन्हा यांनी आपल्या बॉलीवूडमधील प्रवासाबद्दल अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. त्यात हा मजेदार किस्सादेखील होता. ज्यात एकदा शशी त्यांना मारण्यासाठी धावून गेले होते. पण शशी यांनी हे फक्त मजेसाठी केले होते. एकदा शत्रुघ्न शूटसाठी सेटवर उशिरा पोहोचले आणि शशी खूप वेळ त्यांची वाट पाहत होते. त्यांना पाहताच कपूर साहेब त्यांच्या मागे पट्टा घेऊन धावले. त्यावर सिन्हा त्यांना म्हणाले, 'मी वेळेचा खूप पक्का असल्यामुळेच मला या चित्रपटात घेतलं आहे.माझ्यात ती प्रतिभा आहे.' त्यावर शशीजी म्हणाले, 'बघा, हे बोलतानासुद्धा याला काहीच वाटत नाही.' हे सर्व मजा म्हणून घडलं होतं. शत्रुघ्न सिन्हा म्हणतात, 'मी मुद्दाम उशिरा जात नव्हतो. मला वाटायचं माझा व्यायाम वेळेवर पूर्ण झाला पाहिजे. जर ९ ची शिफ्ट असेल तर मी १२ ला पोहोचायचो. पण माझी स्मरणशक्ती खूप चांगली असल्याने मी माझे डायलॉग ताबडतोब पाठांतर करत होतो आणि पहिल्याच टेकमध्ये सीन शूट करून देत होतो. त्यावेळचा मी एकटा वन टेक आर्टिस्ट होतो. नाहीतर निर्मात्यांनी मला चित्रपटातून कधीच काढून टाकलं असतं.' हा किस्सा सांगताना शशी कपूर यांच्या आठवणींनी शत्रुघ्न सिन्हा भावुकही झाले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tlUPgT