मुंबई- बॉलीवूडमध्ये प्रत्येक वर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. त्यातील काहींना प्रेक्षकांची पसंती मिळते तर काहींचा फ्लॉप चित्रपटाच्या यादीत समावेश होतो. कलाकारांनी अशा काही खास तारखा निवडून ठेवल्या असतात ज्या तारखेला ते आपला चित्रपट प्रदर्शित करतात. त्यांच्यासाठी तो दिवस शुभ असतो. त्या दिवशी चित्रपट प्रदर्शित केल्याने तो जास्त कमाई करतो यावर त्यांचा विश्वास असतो. जसे, सुपरस्टार सलमान खान ईदच्या दिवशी आपले चित्रपट प्रदर्शित करतो तर हृतिक रोशनच्या चित्रपटाची तारीख गांधी जयंतीच्या आसपासची असते. त्यातच अभिनेत्री कंगना राणावतनेही आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख गांधी जयंतीच्या दिवशी निश्चित केली आहे. बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या जन्मदिनी म्हणजेच १० जानेवारी रोजी आपला आगामी चित्रपट ''ची घोषणा केली होती. या चित्रपटात हृतिक सोबत दीपिका पादुकोणदेखील मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये ३० सप्टेंबर रोजी गांधी जयंतीच्या २ दिवस अगोदर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. याआधी हृतिकचे 'बँग-बँग' आणि 'वॉर' हे चित्रपटदेखील गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले होते आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईदेखील केली होती. कंगना राणावतदेखील आपला चित्रपट '' १ ऑक्टोबरला प्रदर्शित करणार आहे. कंगनाने आपला आधीचा बॉयफ्रेंड हृतिकच्या आवडत्या तारखेला आपला चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रजनीश घई असून अभिनेत्री दिव्या दत्ता, अभिनेता अर्जुन रामपाल व इतर कलाकार देखील या चित्रपटात दिसणार आहेत. हृतिक आणि कंगनामधील वाद हा सर्वश्रुत आहे. आता हा वाद वैयक्तिक न राहता त्याच्या छटा त्यांच्या कामावरदेखील पाहायला मिळत आहेत. गांधी जयंतीच्या आसपासची प्रदर्शनाची तारीख नक्की कोणासाठी शुभ ठरते हे पाहणे जास्त मनोरंजक ठरणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3teO2Wh