Full Width(True/False)

उत्तराखंड आम्ही आहोत तुमच्यासोबत...बॉलिवूडही हळहळलं

मुंबई: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात जोशी मठाजवळ रविवारी नंदादेवी हिमनदीचा एक भाग तुटल्याने हिमस्खलन होऊन अलकनंदा नदीच्या खोऱ्यात अचानक प्रचंड आला आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या हिमालयीन पर्वतरांगांच्या भागात प्रचंड हाहाकार उडाला. महापुराच्या या तडाख्यात विद्युत प्रकल्प वाहून गेले आणि १२५ मजूर गाडले जाऊन मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर बॉलिवूड कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून हळहळ व्यक्त केली आहे. अभिनेता सोनू सूदनं 'उत्तराखंड आम्ही तुमच्या सोबत आहोत'असं म्हटलं आहे. अक्षनं देखील उत्तराखंडमधील फोटो मन विचलीत करणारे असल्याचं म्हटलं आहे. नेमकी काय आहे घटना?देहरादूनपासून २९५ किमीवर असलेल्या जोशी मठाजवळ झालेल्या या हिमस्खलनानंतर गंगा नदीच्या उपनद्या असलेल्या धौली गंगा, ऋषी गंगा आणि अलकनंदा नद्यांना अचानक प्रचंड पूर आल्याने उत्तराखंडच्या डोंगराळ भागाला तडाखा बसला आणि भयाचे वातावरण पसरले. एनटीपीसीचा तपोवन-विष्णुगड वीज प्रकल्प आणि ऋषी गंगा वीज प्रकल्पांची यात वाताहत झाली आणि तिथे काम करीत असलेले अनेक मजूर अडकले. तपोवन प्रकल्पाच्या बोगद्यात अडकून पडलेल्या १६ मजुरांची बचाव पथकांनी सुटका केली. मात्र, १२५ जण अद्याप बेपत्ता आहेत. https://ift.tt/39UmQV2 अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं देखील तिथल्या लोकांच्या सुरक्षितेसाठी प्रार्थना केलीए.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YQyEkS