मुंबई: बॉलिवूड अभिनेता ७० च्या दशकातील एक नावाजलेले अभिनेता म्हणून ओळखले जात होते. आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकांसोबतच सहाय्यक कलाकारांच्या भूमिकाही साकारल्या. त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं. आपल्या फिल्मी करिअरसोबतच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही बरेच चर्चेत राहिले. विनोद मेहरांनी तीन वेळा लग्न केलं. पण या सोबतच सर्वाधिक चर्चेत राहिलं ते त्यांचं अभिनेत्री यांच्यासोबतचं अफेअर. यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४५ मध्ये अमृतसर येथे झाला होता. १९५५ मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून त्याच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. त्यांनी 'शारदा', 'रागिनी', 'बेवकूफ' यांसारख्या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं. त्यानंतर १९७१ मध्ये आलेल्या 'रिटा'मधून त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून त्यांच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ते 'एलान', 'लाल पत्थर', 'अमर प्रेम', 'अनुराग', '20 साल पहले', 'बंदगी', 'हवस', 'वरदान', 'रफ्तार', 'अर्जुन पंडित', 'नागिन', 'सफेद झूठ', 'अनुरोध', 'घर', 'जानी दुश्मन', 'स्वर्ग नरक', 'दादा', 'अमरदीप' आणि 'द बर्निंग ट्रेन' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसले. विनोद मेहरा त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सुद्धा खूप चर्चेत राहिले. त्यांचं वैवाहिक जीवन खूपच गुंतागुतीचं होतं. १९७४ मध्ये त्यांनी मीना ब्रोका यांच्याशी लग्न केलं मात्र त्यांचा हे लग्न फक्त ४ वर्षंच टिकलं. १९७८ मध्ये दोघांनीही घटस्फोट घेतला. त्यानंतर १९८० मध्ये विनोद यांनी बिंदिया गोस्वामी यांच्याशी लग्न केलं मात्र हे लग्नही ४ वर्षांनी मोडलं. घटस्फोट घेत दोघंही १९८४ मध्ये वेगळे झाले. त्यानंतर १९८७ मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा किरणसोबत लग्न केलं. पण या लग्नाच्या २-३ वर्षांनी विनोद मेहरा यांनी जगाचा निरोप घेतला. संपूर्ण बॉलिवूडसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. ३० ऑक्टोबर १९९० रोजी वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी विनोद मेहरा यांचं निधन झालं. बिंदिया गोस्वामी यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर काही काळ विनोद मेहरा अभिनेत्री रेखा यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी या दोघांच्याही अफेअरच्या चर्चा जोरदार चालल्या. रेखा यांचं अमिताभ यांच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर त्या एकट्या पडल्या होत्या अशात विनोद मेहरा यांची सोबत त्यांना आवडू लागली. या दोघांनी लग्न सुद्धा केलं होतं असं म्हटलं जातं. पण या गोष्टीची पुष्टी दोघांपैकी कोणीच केली नाही. रेखा आणि विनोद मेहरा यांचं नातं फार काळ टिकलं नाही. विनोद यांच्या आईला हे नातं मान्य नव्हतं. त्यामुळे या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qjwOF0