Full Width(True/False)

'या' ऑनलाइन डेटिंग अॅपची सीईओ बनली सर्वात कमी वयाची अब्जाधीश महिला

नवी दिल्लीः Bumble ची CEO आणि को- फाउंडर व्हिटनी वोल्फ हेर्ड () सर्वात कमी वयाची अब्जाधीश महिला बनली आहे. डेटिंट अॅप Bumble चे यूएसमध्ये सार्वजनिक झाल्यानंतर तिच्या नावावर सर्वात कमी वयाची महिला अब्जाधीश बनण्यााचा रेकॉर्ड नावावर झाला आहे. वाचाः Bumble जगातील सर्वात मोठी दुसरी ऑनलाइन डेटिंग कंपनी आहे. ज्यात व्हिटनी वोल्फची जवळपास १२ टक्के भागीदारी आहे. ३१ वर्षीय व्हिटनी वोल्फ ने आपल्या मिळकतीत १.५ बिलियन डॉलरची संपत्ती जमा केली आहे. Bumble चे शेयर IPO मध्ये ४३ डॉलर प्रति शेयरची सुरूवातीची किंमत वाढून ७६ झाली आहे. व्हिटनी वोल्फने स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. आज Bumble एक सार्वजनिक कंपनी बनली आहे. हे शक्य झाले कारण, १.७ बिलियन ब्रेव महिलांनी आमच्या अॅपवर फर्स्ट मूव्ह केले आहे. ज्यांनी बिजनेस वर्ल्ड साठी आमच्यासाठी रस्ता उघडला आहे. आजच्या या दिसवसांसाठी सर्वांनाच धन्यवाद, असे तिने म्हटले आहे. वाचाः Whitney Wolfe Herd आपला डेट अॅप बनवण्याआधी प्रसिद्ध डेटिंग अॅप Tinder मध्ये कामाला होती. Tinder मध्ये ती को-फाउंडर म्हणून काम पाहत होती. परंतु, २०१४ साली तिने टिंडर अॅपला सोडल्यानंतर स्वतः Bumble अॅपची स्थापना केली. व्हिटनीचा Tinder च्या आधीच्या बॉससोबत भांडण झाले होते. त्यामुळे तिने तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेल्या Whitney Wolfe ने स्वतःचा डेटिंग अॅपची स्थापना करून हे स्थान मिळवले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jMxyQL