तुला आनंदाच्या क्षणी कोणता कठीण प्रसंग आठवतो?- मला पुस्तकांची आवड आहे; पण नशिबानं कधी साथ दिली नाही. अवांतर वाचनाची पुस्तकं विकत घेण्याइतपत किंवा ग्रंथालयाचं शुल्क भरून तिथं पुस्तक वाचण्याची संधी कधीच मिळाली नाही. मला अभ्यासाची पुस्तकं घ्यायला परिस्थितीशी झगडावं लागलं. माझ्या आईचे काही दागिने गहाण ठेवून त्या पैशात तिनं माझं परीक्षेचं शुल्क भरली. माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांनी खूप कष्ट घेतले. आता मात्र मी त्यांना स्वबळावर सुखी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. खडतर प्रवासानं काय शिकवलं?- मला आठवतं, मी १४ वर्षांची असताना घरातून पळून गेले होते. तो वेडेपणा किंवा परिस्थितीपासून लांब पळणं होतं; पण मला माझी चूक समजली आणि मी घरी आले. अनुभव आपल्याला सर्व काही शिकवतो. आपण आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी परिस्थितीशी झगडायला हवं, हे मी मनावर बिंबवलं आहे. त्यामुळे मी दिवसा कॉलेज आणि अभ्यास करायचे. संध्याकाळी भांडी घासण्याचं काम करायचे आणि रात्री कॉल सेंटरमध्ये नोकरी करायचे. रिक्षाचं भाडं वाचवण्यासाठी मी तास न् तास चालायचे. मी फक्त एवढंच सांगेन, की जर स्वप्नांवर विश्वास असेल आणि ती पूर्ण करण्याची जिद्द तुमच्यात असेल; तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. ‘२०२० हे वर्ष तू विसरशील का, कारण त्या वर्षानं सर्वांना कटू आठवणी दिल्या आहेत,’ हा प्रश्न तुला अंतिम फेरीत विचारला गेला. या प्रश्नांचं तुझं उत्तर पुन्हा सांगशील?- मी २०२० हे वर्ष कधीच विसरणार नाही, किंबहुना मला ते पुसून टाकायचीही इच्छा नाही. त्याचं कारण असं, की आपण आपल्या चुकांमधून, कठीण प्रसंगांमधून आणि अनुभवातून शिकत असतो. २०२० चा अनुभव माझ्यासाठी किंवा आपल्या सर्वांसाठी कटू असला; तरी त्यानं आपल्याला शिकवण दिली आहे. ही शिकवण विसरून चालणार नाही. त्यातून शिकूनच पुढे चालत राहायला हवं. तुझ्या करिअरचा प्रवास आता कसा असणार आहे?- मी उत्तर प्रदेशची आहे. तिथं साक्षरतेचा दर कमी आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मला काम करायचं आहे. महिलांना शिक्षणाशी कसं जोडता येईल, यावर मला काम करायचं आहे. त्यासह करिअरमध्ये येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा माझा प्रयत्न असेल. मी आणि माझं कुटुंब अनेक रात्री उपाशी झोपलो आहोत. मी पैसे वाचवण्यासाठी कित्येक मैल चालले आहे. माझं रक्त, घाम आणि अश्रू यांनी मला हा विजय मिळवून दिला आहे. मला फार नियमितपणे शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही; कारण मी किशोरवयीन वयातच नोकरी करायला लागले. याच प्रवासानं मला घडवलंय. रिक्षावाल्याची मुलगी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. - , उपविजेती, फेमिना मिस इंडिया २०२० मला मान्याचा सार्थ अभिमान आहे. आता आमची आर्थिक बचत शून्य आहे; पण मान्याला पुढे शिकायचं आहे, त्यामुळे तिच्या शिक्षणासाठी कष्ट घेण्याची माझी तयारी आहे. - ओमप्रकाश सिंग, मान्याचे वडील माझ्या मुलीनं खूप मेहनत घेतली आहे. समोर पडेल ते काम ती करायची. आता ती फक्त आमची नाही; तर संपूर्ण देशाची आहे. - मनोरमा सिंग, मान्याची आई
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2NeAo50