नवी दिल्लीः मोटोरोलाने मार्केटमध्ये आपले दोन नवीन स्मार्टफोन आणि लाँच केले आहेत. सुरुवातीला कंपनीने या दोन्ही फोनला युरोपमधील काही देशात लाँच केले आहे. भारतात हे फोन लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. मोटो जी ३० ची किंमत १८० यूरो म्हणजेच १५ हजार ९०० रुपये आहे. तर मोटो जी १० ची किंमत १५० यूरो म्हणजेच १३ हजार २०० रुपये आहे. जाणून घ्या या दोन स्मार्टफोनविषयी. वाचाः मोटो G30 चे फीचर्स फोनमध्ये 720x1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा आयपीएस एलसीडी दिला आहे. डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येतो. फोनचा डिस्प्ले नॉज डिझाइनचा आहे. यात १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनच्या रियरमध्ये फोटोग्राफीसाठी चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोन ४ जीबी आणि ६ जीबी रॅम ऑप्शन आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणार आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६२ चिपसेट दिला आहे. फोन अँड्रॉयड ११ ओएस वर काम करतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. २० वॉट ची फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येणार आहे. वाचाः मोटो G10 या फोनमध्ये कंपनी ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनला ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑप्शन दिला आहे. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढू शकते. या फोनमध्ये ४६० चिपसेट दिला आहे. जो स्नॅपड्रॅगन ६६२ चे एक क्लॉक्ड डाउन व्हर्जन आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सोबत २ मेगापिक्सलचा कॅमेरे दिले आहे. सेल्फी साठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यसाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. १० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rQnGbw