मुंबई- मागील वर्षी करोना महामारीमुळे चित्रपटगृहांवर टाळं लागलं. त्यामुळे अनेक प्रदर्शनाच्या वाटेवर असलेले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले. परंतु, काही चित्रपटांच्या निर्मात्यांनी बिग बजेट चित्रपट प्रेक्षकगृह खुली झाल्यावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. आता सरकारने चित्रपटगृहांवरील बंदी उठवून संपूर्ण क्षमतेने चित्रपटगृह सुरु करण्यास परवानगी दिल्याने अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचं पार्श्वभूमीवर यशराज फिल्म्स ने बुधवारी ट्विटरवर ट्विट करत त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत घोषणा केली. यशराज फिल्म्स ने ट्विट करत त्यांच्या पाच मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाबद्दल सांगितलं. ज्यात 'बंटी और बबली २', 'जयेशभाई जोरदार', , आणि 'समशेरा' या चित्रपटांचा समावेश आहे. हे पाचही चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहेत. 'संदीप और पिंकी फरार' हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा एक ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. त्यासोबतचं 'बंटी और बबली २' हा चित्रपटदेखील लवकरचं प्रदर्शित होणार आहे. २३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात 'गली बॉय' चित्रपटातील सिद्धांत चतुर्वेदी बंटीच्या भूमिकेत तर नवोदीत अभिनेत्री शर्वरी बबलीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांचे सिनिअर म्हणून सैफ अली खान आणि राणी मुखर्जीदेखील या चित्रपटात आहेत. रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त यांचा बहुचर्चित चित्रपट 'समशेरा' २५ जुन २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. यात रणबीर एका डाकूची भूमिका साकारणार आहे.त्याचप्रमाणे चा चित्रपट 'जयेशभाई जोरदार' मधून अभिनेत्री शालिनी पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट २७ ऑगस्ट २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. शालिनी याआधी सुपरहिट तेलगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी' मध्ये झळकली होती. अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांचा 'पृथ्वीराज' चित्रपट दिवाळीला ५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात संजय दत्त आणि सोनू सूद हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट सम्राट पृथ्वीराज चौहान यांची बायोपिक आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3duhFx9