Full Width(True/False)

'नो किस गर्ल' नावाने प्रसिद्ध होती बॉलिवूड अभिनेत्री, कारण वाचून वाटेल अभिमान

मुंबई: एकेकाळच्या प्रसिद्ध बॉलिवूड यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३३ मध्ये झाला होता. त्यांच्या बॉलिवूड करिअरमध्ये त्यांनी एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांच्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये निम्मी यांचं नाव घेतलं जात असे. निम्मी यांचं खरं नाव नवाब बानो होतं. पण त्यांना निम्मी हे नाव निर्माता यांनी दिलं होतं. पण त्यांना बॉलिवूडमध्ये '' या नावानंही ओळखलं जात असे. १९५२ मध्ये 'आन' चित्रपटाच्या लंडन प्रीमीयरच्या वेळी हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता Errol Flynn यांनी निम्मी यांच्या हाताचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. पण निम्मी यांनी आपला हात मागे घेत त्यांना सांगितलं, 'भारतीय मुली अशा प्रकारच्या चुंबनाचा स्वीकार करू शकत नाही.' या घटनेनंतर निम्मी यांना बॉलिवूडमध्ये 'नो किस गर्ल' या नावाने ओळखलं जाऊ लागलं. वयाच्या १६ वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या निम्मी यांना राज कपूर यांनी पहिल्यांदा 'अंदाज' चित्रपटाच्या सेटवर पाहिलं होतं. त्यानंतर त्यांनी १९४९ मध्ये रिलीज झालेल्या 'बरसात' चित्रपटाची नायिका म्हणून त्यांना साइन केलं. हा चित्रपट हिट झाला आणि त्यानंतर निम्मी यांनी आयुष्यात कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी 'आन', 'उड़न खटोला', 'भाई भाई', 'कुंदन', 'मेरे महबूब', 'दीदार', 'दाग', 'बसंत बहार, 'भाई-भाई' या चित्रपटांमध्ये काम केलं. या सर्वच चित्रपटांनी निम्मी यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. निम्मी यांनी आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत राज कपूर, देवानंद, दिलीप कुमार, नरगिस, मधुबाला, सुरैया, गीता बाली, मीना कुमारी या कलाकारांसोबत काम केलं. त्यांनी १९४९ ते १९६५ पर्यंत चित्रपटांमध्ये सक्रियपणे काम केलं. दरम्यानच्या काळात निम्मी यांना अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या होत्या मात्र त्यांनी हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3u4IpKF