मुंबई- आज ९ फेब्रुवारीला आपला ६३ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. ८० च्या दशकातली सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृता यांनी आपल्या करिअरच्या प्रवासात १२ वर्षांपेक्षाही लहान असणाऱ्या सैफ अली खानशी लग्न केलं. या दोघांनी १९९१ मध्ये कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन लग्न केलं. पण असं म्हटलं जातं की सैफ हे अमृता यांचं पहिलं नक्कीच नव्हतं. त्यांच्या आयुष्यात सर्वातआधी क्रिकेटपटूची एण्ट्री झाली होती. बॉलिवूडमध्ये प्रेम,नाती आणि रोमान्सच्या कथा सतत सुरुच असतात. यातील एक लव्हस्टोरी ही अमृता सिंग यांच्याशी संबंधित आहे. रिपोर्टनुसार, सैफ अली खानच्या आधी अमृता यांच्या आयुष्यात एक क्रिकेटपटू दाखल झाला होता.विशेष म्हणजे हा क्रिकेटपटू दुसरा- तिसरा कोणी नसून भारतीय क्रिकेटचा पोस्टर बॉय म्हणून प्रसिद्ध असणारे होते. तो एक असा काळ होता जेव्हा वृत्तपत्र आणि मासिकांच्या पानांवर अमृता सिंग यांचं वर्चस्व होतं. जेव्हा एका मासिकासाठी (सिने ब्लिट्झ मासिक, 1986 आवृत्ती) दोघांनी एकत्र फोटोशूट केलं तेव्हापासूनच दोघांच्या नात्याची चर्चा सर्वांच्या जिभेवर रंगू लागली होती. अमृता सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांना पहिल्यांदा पाहिल्यावरच रवी त्यांच्या प्रेमात पडले होते. दोघांच्या नात्याचे अनेक किस्से तेव्हा वाचले जायचे. पण देवाच्या मनात मात्र काही वेगळं सुरू होतं. दोघांनी साखरपुडा केल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण नंतर अमृता यांच्या आयुष्यात अनेक वादळं आली आणि हे नातं तुटलं. दरम्यानच्या काळात रवी शास्त्री यांनी एक विधान दिलं. 'मला कोणतीही अभिनेत्री पत्नी म्हणून नको. माझ्या पत्नीचं पहिलं प्राधान्य माझं कुटुंब आणि घर असलं पाहिजे.' यानंतर, अमृता सिंग यांनीही आपलं उत्तर देत म्हटलं होतं की, 'मीसुद्धा सध्या माझ्या करिअरमध्ये पूर्णपणे व्यग्र आहे, परंतु मला खात्री आहे की काही वर्षानंतर मी माझा पूर्णवेळ कुटुंबासाठी आणि मुलांसाठी देऊ शकेन.' यानंतर दोघांनी आपलं नातं संपवलं. रवी शास्त्री यांनी १९९० मध्ये रितूशी लग्न केलं. पण २०१२ मध्ये दोघं वेगळे झाले. तर अमृता सिंग यांनी १९९१ मध्ये सैफ अली खानशी लग्न केलं. २००४ मध्ये दोघंही विभक्त झाले.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rxWZYU