मुंबई- यांच्या मृत्यूला आता जवळपास नऊ महिने झाले आहेत. त्याच्या जाण्याने जी पोकळीक निर्माण झाली आहे ती कधीही न भरून निघणारी आहे. भलेही आता सुशांतसाठी कोणी काहीही करू शकलं नाही तरी भारत सरकारने एका पुरस्काराला त्याचं नाव देण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. अशी चर्चा आहे की सुशांतचं नाव कायमसाठी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये नोंदवलं जाईल. रिपोर्टनुसार, भाजपशी संबंधित एका सूत्रांनी सांगितले की, 'सुशांतसिंह राजपूत याच्या नावावर एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ठेवण्याची चर्चा होत आहे. या प्रस्तावाला मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारी कामांमध्ये सर्व गोष्टींची पूर्तता होईपर्यंत वेळ लागतो. पण हे काम झालंच पाहिजे.' सुशांतच्या मृत्यूनंतर बर्याच गोष्टींवर झाली चर्चा हे लक्षात घेण्यासारखं आहे की सुशांतच्या मृत्यूवेळी बर्याच गोष्टींवर चर्चा झाली होती. पण त्या संबंधीचा कोणताही निष्कर्ष पुढे आला नाही. एवढंच नाही तर सुशांतच्या जीवनावर एक सिनेमाही जाहीर करण्यात आला. पण त्यानंतर त्यावर कोणतेही अपडेट समोर आले नाहीत. सुशांतच्या बायोपिकचं नाव 'न्याय- द जस्टिस' सुशांतच्या बायोपिकविषयी बोलायचं झालं तर त्याच्या बायोपिकचं नाव 'न्याय: द जस्टिस' असं ठेवण्यात आलं आहे. हा सिनेमा संपूर्णपणे सुशांतच्या आयुष्यावर आधारित असेल असं म्हटलं जात आहे. विकास प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती सरला ए सारोगी आणि राहुल शर्मा करणार आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ulIVUM