Full Width(True/False)

जेव्हा इलेक्ट्रिक शॉक देऊन वाचवण्यात आला होता अभिनेत्रीचा जीव

मुंबई- अश्लील सिनेमे बनवण्यासाठी मुंबई क्राइम ब्रँचने शुक्रवारी गेहना वशिष्ठ हिच्यासह पाचजणांना अटक केली. ८५ पेक्षा जास्त अश्लील सिनेमे बनवून ऑनलाइन अ‍ॅपवर विकल्याचादेखील आरोप तिच्यावर आहे. याआधी गेहना तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा चित्रीकरणा दरम्यान, तिला हृदयविकाराचा झटका आला होता आणि तिचे प्राण वाचवणं कठीण झालं होतं. २०१९ मधली ही घटना आहे. त्यावेळी गेहना एका वेब सीरिजचं चित्रीकरण करत होती. रिपोर्टनुसार, काहीही न खाता सलग ४८ तास शूटिंग केल्यामुळे ती सेटवरच बेशुद्ध पडली. स्ट्रोक आणि कमी रक्तदाब गेहनाला हृदयविकारचा झटका आला. तिच्या नाडीचे ठोकेही कमी झाले होते आणि गेहनाला स्वतःहून श्वास घेता येत नव्हता. सेटवरच्या टीमने तिला तातडीने इस्पितळात नेलं. मुंबईतील मालाड येथील डिफेन्स इस्पितळात तिला दाखल करण्यात आलं. उपचारांदरम्यान इस्पितळाच्या प्रमुखांनी सांगितलं की, गेहनाची तब्येत किमान ठीक होण्यासाठी दोन तास तरी लागतील. यासाठी तिला इलेक्ट्रीक शॉकदेखील द्यावा लागला होता. त्यावेळी गेहनाची प्रकृती खूपच गंभीर होती आणि तिला काही तास आयसीयूमध्ये ठेवलं होतं. ऑक्सिजनची पातळी नियमित करण्यासाठी डॉक्टरांनी काही तासांसाठी गेहनाला व्हेंटिलेटरवरदेखील ठेवलं होतं. गेहना वसिष्ठला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. चित्रीकरणा दरम्यान तिने फक्त एनर्जी ड्रिंक्स आणि औषधं घेतल्याचा दृष्परिणाम तिच्या शरीरावर झाला होता. गेहना वशिष्ठचं खरं नाव वंदना तिवारी आहे. टीव्ही व्यतिरिक्त तिने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. अलीकडेच ती एकता कपूरच्या वेब गाजलेल्या 'गंदी बात' मध्ये दिसली होती. याशिवाय ती 'बहनें' मालिकेतही दिसली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cRwQQA