मुंबई: अभिनेत्री मागच्या काही काळापासून विकी जैनसोबतच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत आहे. नुकताच तिनं व्हॅलेंटाइन विकीसोबत व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट केला. ज्याचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले होते. अशातच आता तिचा असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अंकितासोबत तिचा बॉयफ्रेंड सुद्धा दिसत आहे. विकी आणि अंकिता कारमधून जात असताना काही फोटोग्राफर त्यांचा व्हिडीओ शूट करत होते. त्यावेळी अंकितानं त्यांना 'सांभाळून चला नाहीतर लागेल' असं म्हणताना दिसत आहे. पण तिचं हे बोलणं युझर्सना मात्र आवडलेलं नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अंकिता आणि तिचा बॉयफ्रेंड कन्वर्टिबल कारमधून जात आहेत. पण तिथे फोटोग्राफर्सना पाहून अंकिता अनकम्फर्टेबल होते. पण तरीही ती फोटोग्राफर्सना रोडवर गाडी चालवताना कुठे काही लागू नये यासाठी सांभाळून चालायला सांगते. पण अंकिताची ही कमेंट युझर्सना आवडलेली नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युझरनं लिहिलं, सर्वांना दाखवण्यासाठी अशा कारमधून जात मग पाहिल्यावर कॅप्चर केलं तर एवढा अॅटीट्यूड कशासाठी दाखवायचा. अंकितानं तिच्या व्हॅलेंटाइन सेलिब्रेशनचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेले दिसत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3b4Xi6R