मुंबई: बॉलिवूड अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळं नेहमीच चर्चेत असतो. गर्लफ्रेंड मलायकासोबत डेटवर जाणं असो किंवा त्यानं तिच्यासाठी केलेली एखादी गोष्ट, नेटकरी नेहमीच दोघांना ट्रोल करतात. पण सध्या नेटकरी अर्जुनचं कौतुक करत आहे. काल झालेल्या 'व्हॅलेन्टाईन' डेच्या निमित्ताने त्यानं घेतलेल्या एका निर्णयामुळं सध्या तो चर्चेत आहे. अर्जुनची आई मोना शौरी यांचा मृत्यू कर्करोगामुळं झाला होता. त्यामुळं कर्करोगामुळं आपल्या जवळच्या व्यक्तीला गमवण्याचं दु:ख जे त्याच्या वाट्याला आलं आहे ते इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी अर्जुनं कर्करोग असलेल्या १०० रुग्णांना मदत करण्याचा निर्णय घेतलाय. अनेक जोडप्यांचं सुखी संसाराचं स्वप्न कर्करोगानं भंग केलं. जोडीदाराला कर्करोगाशी लढण्यासाठी बळ दिलं तरी अनेकांना आर्थिक मदतीची गरज असते. त्यामुळं अशा १०० जोडप्यांना व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्तानं अर्जुन मदत करणार आहे.‘कॅन्सर पेशंट्स अॅण्ड असोसिएशन’ (सीपीएए) यांच्या सोबत काम करण्याचं ठरवलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ajVisg