Full Width(True/False)

शिवरायांची भूमिका साकारणाऱ्या 'या' कलाकारांचं झालंय कौतुक

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी गडावर झाला. मराठ्यांचा स्वाभिमान आणि भारतीय गणराज्याचे महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत मिळून अनेक वर्ष मुघलांशी लढा देऊन त्यांना धूळ चारली होती. मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटांनी देखील त्यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर मांडला. या चित्रपट व मालिकांमध्ये अनेक दिग्गज कलाकारांना महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. प्रेक्षकांकडून त्यांच्या अभिनयाचं कौतुकही करण्यात आलं. अभिनेता शरद केळकर त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. ओम राऊतच्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात शरदने छत्रपती यांची भूमिका साकारली होती. चित्रपटात अजय देवगन तान्हाजी मालुसरे या मुख्य भूमिकेत होता तर सैफ अली खानने उदयभान सिंह राठोड ही भूमिका वठवली होती. सोबत दमदार कलाकार असूनही शरदने त्याच्या अभिनयाने शिवाजी महाराजांच्या पात्राला एक विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं. सर्व प्रेक्षकांनी त्यासाठी शरदचं प्रचंड कौतुक केलं होतं. अमोल कोल्हे अभिनेता अमोल कोल्हे यांनी पडद्यावर शिवाजी महाराजांची भूमिका अनेकदा साकारली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'राजा शिवछत्रपती' या मालिकेत त्यांनी राजांची भूमिका साकारली होती. शिवाय 'राजमाता जिजाऊ' या मालिकेतही त्यांनी महाराजांची भूमिका केली. हिंदी वेबसीरिज 'वीर शिवाजी' मध्येही त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका निभावली होती. महेश मांजरेकर बॉलिवूडचे दमदार अभिनेते महेश मांजरेकर यांनी २००९ साली 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट एका सर्व सामान्य व्यक्तीच्या जीवनावर आधारित होता. ज्यात शिवाजी महाराज त्याचे मार्गदर्शक झाले होते. नसिरुद्दीन शाह श्याम बेनेगल यांच्या 'भारत की खोज' या प्रसिद्ध मालिकेत नसिरुद्दीन शाह यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या मालिकेत इरफान खान आणि ओम पूरी देखील मुख्य भूमिकेत होते. प्रेक्षकांनी त्यांच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. चिन्मय मांडलेकर अभिनेता चिन्मय मांडलेकर यानेही 'फत्तेशिकस्त' या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट शिवरायांच्या मोहिमेवर आधारित होता. प्रेक्षकांकडून चिन्मयच्या या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3s1sE5c