Full Width(True/False)

...म्हणून अपूर्वा नेमळेकरनं 'तुझं माझं जमतंय' मालिका सोडली; समोर आलं खरं कारण

मुंबई: '' या मालिकेमुळे अभिनेत्री प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेत अपूर्वाने साकारलेली ही भूमिका तुफान गाजली होती. ती मालिका संपल्यानंतर लगेचच अपूर्वाला '' ही दुसरी मालिका मिळाली होती. या मालिकेतली तिची पम्मी ही भूमिकाही प्रेक्षकांना आवडत आहे. पण आता अपूर्वाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला अपूर्वानं मालिका सोडल्यानंतर यामागचं नेमकं कारण काय? याबद्दल चर्चा सुरू होत्या.अपूर्वा आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये मतभेद झाल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी चित्रीकरणाच्या तारखांसंबंधी वादही झाल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे अपूर्वानं मालिकेचा निरोप घेतला आहे. आता पम्मीची भूमिका अभिनेत्री साकारत आहे. 'देवमाणूस' मालिकेत मंजू नामक व्यक्तिरेखा प्रतिक्षा साकारत होती. पण मालिकेत मंजूचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आता प्रतिक्षा 'तुझं माझं जमतंय' या मालिकेत पम्मी हे पात्र साकारताना दिसतआहे. तसंच 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचा तिसरा सीझनही येणार आहे. त्यात शेवंता दिसणार का? असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत. याची उत्तरं लवकरच मिळतील.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sukgLY