Full Width(True/False)

अनुप सोनीनं सांगितलं 'फत्तेशिकस्त' निवडण्यामागचं कारण , म्हणाला...

० थ्रिलर या प्रकारालाच प्राधान्य द्यायचं असं ठरवलं आहेस का?- ''मध्ये वेगळ्या प्रकारची भूमिका साकारण्यासाठी विचारण्यात आलं. शिवाय, राजकीय नाट्य असलेली सीरिज होती म्हणून स्वीकारली. फक्त थ्रिलर प्रकारालाच प्राधान्य द्यायचं असं ठरवलेलं नाही. अनेक भूमिकांसाठी विचारण्यात येतं. त्यातल्या त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करुन बघण्याचा प्रयत्न असतो. या सगळ्यात थ्रिलर प्रकार ओघानेच निवडला जातो. ० छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार ओटीटीवर येत आहेत, यामागची कारणं काय असावीत?- कलाकार नानाविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आतुर असतो. ही संधी ओटीटीवर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. छोट्या पडद्यावर विशिष्ट प्रकारची भूमिका मिळाली की ती दीर्घकाळ साकारावी लागते. पुढे तशाच प्रकारच्या भूमिकांसाठी विचारलं जातं. ते चक्र सुरु राहतं. म्हणून मी गेली काही वर्षं छोट्या पडद्याच्या ऑफर्स स्वीकारत नाही. मला ओटीटीवर भिन्न-भिन्न प्रकारच्या भूमिका साकारायची संधी मिळत आहे. म्हणूनच छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार ओटीटीकडे वळत असावेत असा माझा अंदाज आहे. ० ओटीटी इतर माध्यमांपेक्षा वेगळं वाटतं का?- छोट्या पडद्यावर संपूर्ण कुटुंबाला बघता येईल असे विषय हाताळले जातात. तर वेबविश्वाचा प्रेक्षक विविध प्रकारचं कथानक स्वीकारण्यासाठी तयार आहे. त्या प्रेक्षकांची मानसिकताच वेगळी आहे. यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कथा पुढे येत आहेत. ० मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता? यापुढे आणखीन मराठी चित्रपटांत दिसणार का?- प्रभावी संहिता हे 'फत्तेशिकस्त' निवडण्यामागचं कारण होतं. प्रत्येक पात्र ताकदीने उभं राहताना मजा आली. ती प्रक्रिया खूप काही शिकवणारी होती. दिग्दर्शकाने विश्वास दाखवला म्हणून मी तो चित्रपट स्वीकारला. भविष्यात विचारणा झाली तर नक्कीच स्वीकारेन. मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी वेळ लागेल. पण काम करायला आवडेल. ० करोनाकाळात तुम्ही एका तंत्रज्ञाला मदत केली होती. त्याच्याशी संपर्कात आहात का? अशा आणखीन किती लोकांना मदत केलीत?- कठीण काळात अनेक जण गरजूंच्या मदतीला धावून गेले. मी काही वेगळं केलेलं नाही. मी त्या तंत्रज्ञाच्या संपर्कात होतो. माझ्या हातात होतं तेवढी मी त्याला मदत केली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36KmQ7W