मुंबई : भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानाने ट्विट केलं आणि या आंदोलनाला एक वेगळीच दिशा मिळाली. तिच्या या ट्विटनंतर बऱ्याच दिग्गज कलाकारांनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट करण्यास सुरुवात केली. रिहानाच्या ट्विटला बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी विरोधही दर्शवला. सध्या हा विषय सोशल मीडियावर ट्रेडिंग आहे. अशातच आता अभिनेता सोनू सूदने एक ट्विट केलं आहे. त्याचं हे ट्विट पाहून नेटकरी बुचकळ्यात पडले आहेत. लॉकडाऊनमध्ये सोनू सूदने हजारो लोकांना मदत केली. बॉलिवूडचा हा हिरो सर्वसामान्यांना आपल्यातला वाटू लागला. आपल्या चांगल्या कामामुळे चर्चेत राहणारा सोनू आता त्याच्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सोनूनेही शेतकरी आंदोलनाबाबत एक ट्विट केलं आहे. पण त्याचं हे ट्विट काहीसं वेगळं आहे. ‘गलत को सही कहोगे तो नींद कैसे आएगी?’ असं एका वाक्यात त्याने ट्विट केलं आहे. जर चुकीच्या गोष्टीला तुम्ही बरोबर बोलत असाल तर झोप कशी येणार? असे सोनूने ट्विटद्वारे म्हटल्यावर नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं पण अनेकजणांना त्याला नेमकं काय बोलायचं आहे? असा प्रश्न पडला. सोनूने ट्विट करताच त्याचं हे ट्विट हजारो जणांनी रिट्विट केलंय. तर काहींनी त्याला अनेक प्रश्न विचारले आहेत. ‘सोनू तुला काही बोलायचे आहे ते खुलेपणाने बोल’ अशा प्रकारच्या कमेंट्स अनेक जणांनी त्याच्या या ट्विटला केल्या आहेत. खरंतर शेतकरी आंदोलनाबाबत सोनूची भूमिका नेमकी काय आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. हिंदी चित्रपटसृष्टीमधील बऱ्याच अभिनेत्यांनी शेतकरी आंदोलनाबाबत बोलायला सुरुवात केली आहे. तसेच भारताबाहेरील कलाकारांनी शेतकरी आंदोलनाबाबत बोलू नये असंही काही कलाकारांनी त्यांच्या ट्विटमधून म्हटलं आहे. यामुळे बऱ्याच कलाकारांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. हायलाईट्स
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cI2ujv