नागपूर : ‘’ या मोबाइल गेमच्या वेडापायी घरून पलायन केलेल्या तीन मुलांना प्रतापनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी रात्री पोलिस मुलांना घेऊन नागपूरकडे रवाना झाले. सोमवारी मुले नागपुरात येणार येतील. मुलांसोबत त्यांचे नातेवाइकही आहेत. वाचाः शनिवारी पहाटे प्रतापनगर भागात राहणारी १६ वर्षीय तीन मुलांनी पलायन केले. ते रेल्वेने मुंबईकडे निघाले. दरम्यान मुले बेपत्ता झाल्याने नातेवाइकांमध्ये खळबळ उडाली. नातेवाइकांनी प्रतापनगर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर ठोसरे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. मुले नागपूर रेल्वेस्थानकावर गेल्याचे आढळले. पोलिसांनी रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. ते मुंबईकडे जाणाऱ्या गाडीत बसल्याचे दिसले. वाचाः पोलिसांनी भुसावळ नाशिक व मुंबई लोहमार्ग पोलिस व रेल्वेसुरक्षा दलातील अधिकाऱ्यांना माहिती दिली. शनिवारी सायंकाळी नाशिकमधील रेल्वेसुरक्षा दलाच्या जवानांनी तिघांना ताब्यात घेतले. माहिती मिळताच प्रतापनगर पोलिस व मुलांचे नातेवाइक नाशिककडे रवाना झाले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रविवारी सायंकाळी पोलिस मुलांना घेऊन नागपूरकडे रवाना झाले. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3b4bvRD