मुंबई- ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी भावाला तातडीने जवळच्या इस्पितळात भरती केलं, पण उपचार सुरू करण्यापूर्वीच राजीव कपूर यांचं निधन झालं होतं. रणधीर यांनी स्वतः राजीव यांचं निधन झाल्याचं सांगितलं. भावाच्या निधनाबद्दल रणधीर म्हणाले की, 'आज मी माझ्या छोट्या भावाला राजीवला गमावलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. पुढील सर्व कामांसाठी आता मी इस्पितळातच आहे.' राजीव कपूर हे विशेषतः 'राम तेरी गंगा मैली' (१९८५) आणि 'एक जान हैं हम' (१९८३) मधील अभिनयासाठी प्रसिध्द आहेत. ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'प्रेमग्रंथ' सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. नितू कपूर यांनी राजीव कपूर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39YHtPP