मुंबई- 'जिंदगी की ना टूटे लडी, प्यार कर ले घडी दो घडी' यांसारख्या अनेक सदाबहार लोकप्रिय गाण्यांनी बॉलीवूडला नवीन ओळख मिळवून देणारे गीतकार आज अत्यंत हलाखीचं जीवन जगत आहेत. वयाच्या या टप्प्यावर संतोष यांचं शरीरही त्यांची साथ देत नाही. शिवाय त्यांच्याकडे आता कोणतंही काम नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असताना बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका हिने त्यांना मदतीचा हात दिला आहे. या आठवड्यात '' च्या मंचावर लक्ष्मीकांत-प्यारेलाल ही संगीतमय जोडी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या टीमने प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांनाही कार्यक्रमात आमंत्रित केलं. संतोष आनंद यांनी अनेक वर्ष प्यारेलाल यांच्यासोबत काम केलं. कार्यक्रमादरम्यान गीतकार आनंद त्यांच्या आयुष्यातील अडचणी सांगताना दिसणार आहेत. सध्या ते कोणत्या परिस्थितीला सामोरे जात आहेत त्याबद्दल ते सांगणार आहेत. ते ऐकून शोची परीक्षक असलेली नेहा मंचावर जाते. त्यांचे आशीर्वाद घेते आणि त्यांना आर्थिक मदतीचं आश्वासनही देते. कार्यक्रमात आनंद हे त्यांच्यावर असलेल्या कर्जाच्या डोंगराबद्दल सांगताना दिसत आहेत. त्यांच्या या परिस्थितीने दुःखी झालेल्या नेहाने त्यांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली. सोबतच तिने बॉलिवूडमधील इतर कलाकारांनाही संतोष आनंद यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. तिने आनंद यांच्यासाठी 'प्यार का नगमा' हे गीत देखील गायलं. संतोष यांचं नाव त्यावेळच्या मोठ्या कलाकारांमध्ये घेतलं जात असे. 'जिंदगी की ना टूटे लड़ी प्यार कर ले घड़ी दो घड़ी' सोबतचं 'मोहब्बत है क्या चीज', 'इक प्यार का नगमा है' आणि 'मेघा रे मेघा रे मत जा तू परदेस' यांसारखी अनेक गाणी त्यांनी बॉलीवूडला दिली. त्यांनी १९७० सालच्या 'पूरब और पश्चिम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bAgoST