मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने काही दिवसांपुर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ती तिचा संपूर्णवेळ तिच्या कुटुंबाला देत आहे. तिच्या बाळाच्या उत्तम संगोपनाकडे तिचा कल आहे. असं असलं तरीही, अनुष्का सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे आणि कुटुंबाचे फोटो व व्हिडीओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी अनुष्काने पती विराट कोहली सोबतचा एक अत्यंत सुंदर फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला असून सोबत प्रेमळ मेसेजही लिहिला. जो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे आणि त्यावर चाहत्यांच्या कमेंट्स येत आहेत. अनुष्काने शेअर केलेला फोटो अत्यंत सुंदर असून त्यात अनुष्का आणि विराट एकमेकांच्या प्रेमात असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोत त्या दोघाच्या मागे मावळणारा सूर्य स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोला चाहत्यांसोबत शेअर करत अनुष्काने लिहिलं, 'आजच्या दिवसाबद्दल खास असं काही नाही, पण सुर्यास्ताचा फोटो टाकण्यासाठी हा दिवस अत्यंत योग्य आहे. आज व्हॅलेंटाइन डे आहे आणि माझा व्हॅलेंटाइन प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला माझ्या सोबत आहे.' त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे. याआधीही अनुष्काने एक आरशात बघतांनाचा फोटो शेअर केला होता. त्यात तिच्या खांद्यावर बर्प क्लोथ होता. त्या फोटोवर तिने लिहिलं, 'माझी आताची सगळ्यात जास्त आवडणारी वस्तू- बॅर्प क्लोथ' अनुष्काने ११ जानेवारी रोजी एका मुलीला जन्म दिला होता. आपल्या मुलीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर करत तिने तिच्या मुलीच्या नावाचा खुलासा केला होता.. अनुष्का आणि विराट यांच्या मुलीचं नाव 'वामिका' आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Zjxxu4