मुंबई: 'होणार सून...'मधल्या श्री या व्यक्तिरेखेमुळे तुफान लोकप्रियता मिळालेल्या अभिनेता शशांक केतकरनं मालिकेनंतर 'गोष्ट तशी गंमतीची' या नाटकात काम केलं. त्यानंत तो 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला होता. आता तो ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतकंच नाही तर शशांकची बहिण ही देखील लवकरच छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेच्या माध्यमातून शशांक घराघरात पोहोचला आणि लोकप्रिय झाला. शशांकची बहिण '' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीक्षाच्या या आगामी मालिकेचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.मालिकेच्या प्रोमोमध्ये एक नवीन चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला आला. अल्पावधीतच हा चेहरा लक्षवेधी ठरत आहे. हा चेहरा आहे दीक्षा केतकर हिचा. या मालिकेत दीक्षासोबत ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर ,हरीश दुधाडे हे कलाकारही मालिकेत असणार आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3u8wcog